बारसूवरुन आदित्य ठाकरेंची टीका, फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “विरोधाला विरोध करायचा...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:22 PM2023-08-05T12:22:36+5:302023-08-05T12:23:36+5:30

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे अभ्यास करून बोलतील, असे वाटत होते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला.

devendra fadnavis replied aaditya thackeray over criticism on barsu refinery project | बारसूवरुन आदित्य ठाकरेंची टीका, फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “विरोधाला विरोध करायचा...”

बारसूवरुन आदित्य ठाकरेंची टीका, फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “विरोधाला विरोध करायचा...”

googlenewsNext

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray: बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला आला होता. बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी आराम्को ही कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. बारसू रिफायनरीला उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांबरोबर जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार असून, पाकिस्तानला तिचा फायदा होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

नाणार असो की बारसू असो… भाजप महाराष्ट्रद्वेषी आहे, हे वारंवार दिसतेच. त्याबरोबरच दिसते ते शिंदेंच्या सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणे! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी? पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग’ अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत. उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. स्वतःचे खोटे रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. 

विरोधाला विरोध करायचा आहे

किमान आदित्य ठाकरे अभ्यास करून किंवा भाषण ऐकून बोलतील, असं मला वाटत होते. आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधलीय आणि विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय? या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.

दरम्यान, बारसू प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला पुढील २० वर्षे चालना मिळणार असल्याने आपल्या सरकारी कंपन्या ही रिफायनरी तयार करतील, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बारसू रिफायनरीबाबत सविस्तर उत्तर देताना राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून उद्योगातही राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केला.
 

Web Title: devendra fadnavis replied aaditya thackeray over criticism on barsu refinery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.