Devendra Fadnavis on Vinayak Mete Accident: मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकार Mumbai Pune Express Way बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:11 AM2022-08-22T11:11:04+5:302022-08-22T11:11:44+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासाबाबत बोलताना दिली माहिती

Devendra Fadnavis shares important updates about upgradation of ITMS system on Mumbai Pune Express way after Vinayak Mete Accident Case | Devendra Fadnavis on Vinayak Mete Accident: मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकार Mumbai Pune Express Way बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Devendra Fadnavis on Vinayak Mete Accident: मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकार Mumbai Pune Express Way बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

googlenewsNext

Devendra Fadnavis on Vinayak Mete Accident: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते विनायक मेटे यांचे १४ ऑगस्टला अपघाती निधन झाले. मुंबईपुणे एक्सप्रेस वे वर नवी मुंबईतील पनवेल जवळ या अपघात घडला. प्रथमदर्शनी जरी हा अपघात वाटत असला तरी यात काही मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या अपघात संबंधीचा तपास आता सीआयडी करत आहे. याच संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या अपडेट्स विधीमंडळात बोलताना सांगितल्या. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता एक्सप्रेसवर ITMS सिस्टीमचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नक्की काय आहे ही सिस्टीम जाणून घेऊया...

विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासाबद्दल अधिकची माहिती देताना आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अपघात झाल्यानंतर मेटेंच्या ड्रायव्हरने जेव्हा ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला तेव्हा नवी मुंबई पोलिस मदतीसाठी तातडीने निघाले होते. पण अपघाताच्या धक्क्यामुळे ड्रायव्हर काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की लोकेशन सांगता आले नाही. आम्ही पनवेल जवळ आहोत इतकंच तो सांगू शकला. अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी बराच शोध घेतला. त्यानंतर रायगड पोलिसांनाही माहिती दिली. रायगड पोलीसही मदतीसाठी निघाले होते. या दरम्यान एक्सप्रेस वे चे व्यवस्थापन पाहणाऱ्या IRB कंपनीला अपघाताची माहिती मिळाली. त्यांची मदत लगेच तिथे पोहोचली पण दुर्दैवाने रूग्णालयात पोहोचेपर्यंत मेटे यांचे निधन झाले होते.

एक्सप्रेस वे बद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत...

याच संदर्भात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आता राज्य सरकार मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ITMS म्हणजेच इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम चा वापर करण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास एक्सप्रेस वर होत असलेल्या हालचालींवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे सोयीचे होईल. त्याशिवाय, ११२ क्रमांकावर जेव्हा कोणताही व्यक्ती मदतीसाठी फोन करेल त्यावेळी तो मोबाईल वरूनच फोन करेल हे गृहित धरून थेट त्या व्यक्तिच्या फोन चे लोकेशन पोलिसांना कळेल अशी व्यवस्था लवकरच करण्याचा विचार सुरू असल्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले.

Web Title: Devendra Fadnavis shares important updates about upgradation of ITMS system on Mumbai Pune Express way after Vinayak Mete Accident Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.