"फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:01 AM2022-08-23T06:01:15+5:302022-08-23T06:01:33+5:30

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला.

devendra fadnavis showed you love mercy compassion it cannot be shown again and again cm eknath shinde slams dhananjay munde | "फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही"

"फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही"

googlenewsNext

मुंबई :

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली. पण, परत परत ती दाखविता येणार नाही, असे सूचक उद्गार शिंदे यांनी मुंडेंबाबत काढले.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे विधान भवनाच्या पायऱ्या चढत असताना जोरदार घोषणाबाजी गेल्या आठवड्यात केली होती. ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘ताट, वाटी चलो गुवाहाटी’ अशा घोषणा देण्यात मुंडे पुढे होते. आज थेट नगराध्यक्ष निवडीसंबंधीच्या विधेयकावर बोलताना शिंदे यांनी मुंडे यांना लक्ष्य केले. धनंजय मुंडे परवा मोठमोठ्याने ओरडत होते, ‘चलो गुवाहाटी... चलो गुवाहाटी...’ अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत होते. जणू काय ते खूप वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. आता, यांच्याबद्दल काय बोलावे, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावरील चर्चेवेळी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. विधानभवनात येतानाच जणू काही बाह्या सरसावत अचूक टायमिंग साधायचा मनसुबा त्यांनी रचला असावा. 

एकनाथच राहा, ‘ऐकनाथ’ होऊ नका : मुंडे
नगराध्यक्ष पदाबाबत नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला निर्णय भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बदलावा लागला हे दुर्दैवी आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. सत्ता बदलताच मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा निर्णय स्वत:च बदलला, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्कील टिप्पणी मुंडेंनी केली.

विरोधकांची पुन्हा नारेबाजी
‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके, माजलेत बोके’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘गद्दारांचं सरकार हाय हाय’, ‘आले रे आले.. गद्दार आले’  अशा घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी सोमवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. ‘ईडी ज्याच्या घरी, तो भाजपच्या दारी’ अशी घोषणाही देण्यात आली.

मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा; अजित पवार
मुंबई : नगराध्यक्षच कशाला, मग मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा ना. अहो! आमदार तुमच्या पाठीशी होते म्हणून त्यांच्यातून तुम्ही मुख्यमंत्री झाला. नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची आधीची पद्धत कायम ठेवली तर एखाद्या नगरसेवकाला एकनाथ शिंदे बनून नगरसेवकांमधून नगराध्यक्ष बनता येईल ना...! असे चिमटे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत काढले. थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या विधेयकावरील चर्चेत अजित पवार म्हणाले की, थेट नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत आणली तर धनदांडगे, ‘मनी-मसल पॉवर’ असलेले लोकच नगराध्यक्ष होतील. सामान्य आर्थिक परिस्थितीचे नगरसेवक नगराध्यक्ष  होणार नाहीत.

 

Web Title: devendra fadnavis showed you love mercy compassion it cannot be shown again and again cm eknath shinde slams dhananjay munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.