Devendra Fadnavis: अमरावतीतील दंगलीवरुन देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक, म्हणाले हा 'प्रयोग' होता!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:35 PM2021-12-27T18:35:12+5:302021-12-27T18:35:48+5:30

अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला आहे.

Devendra Fadnavis slams state govt over Amravati riots says it was an experiment | Devendra Fadnavis: अमरावतीतील दंगलीवरुन देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक, म्हणाले हा 'प्रयोग' होता!

Devendra Fadnavis: अमरावतीतील दंगलीवरुन देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक, म्हणाले हा 'प्रयोग' होता!

Next

मुंबई-

अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल चढवला. फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरुवातच अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यानं केली. 

एका रात्रीत चाळीस-चाळीस हजाराचा जमाव रस्त्यावर येतोच कसा? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग राज्यात केला गेला आहे. यात जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकांना लक्ष्य केलं गेले. हिंदुच्याच दुकानांची तोडफोड केली गेली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यादिवशी अमरावतीत संबंधित प्रकार घडला त्यादिवशीच्या घटनेबाबत कुणी बोलायला मागत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम उमटले त्यावरच सगळे बोलू लागले आणि त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे हे अतिशय दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दंगलीत आपली मोटारसायकल जाळली जाईल अशी भीती होती म्हणून तरुण आपली मोटारसायकल घरात नेत होता. तर त्याला पकडून पोलिसांनी अटक केली, असे प्रकार अमरावतीत घडले आहेत असंही फडणवीस म्हणाले. 

रझा अकादमीचे लोक रातोरात राज्यात दंगलीचे प्रयोग करतायत मग यावर सरकार काय कारवाई करणार? रझा अकदमीबाबत काही निर्णय घेतला जाणार आहे की नाही?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात बदल्यांचं रॅकेट
"आज राज्यात पोलीस दलाची अवस्था जर सुधारली नाही तर देशात सर्वोत्तम मानलं जाणारं महाराष्ट्राचं पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही. माझ्याकडे बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती समोर आली. मी माझ्याकडची माहिती गृहसचिवांना दिली तर काय चुकीचं केलं? उलट मी खूप जबाबदारीनं वागलो. मी ती माहिती माध्यमांना दिली नाही. पण सरकारमधील काहीच लोकांनी माध्यमांकडे माहिती दिली याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. पोलीस जर दोन-तीन कोटी देऊन आज जर पदावर येत असतील ते वसुलीच करणार नाहीत का?", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: Devendra Fadnavis slams state govt over Amravati riots says it was an experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.