अमित शाहांनी आश्वासन पाळले, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवरील मोठे संकट टळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 09:07 PM2022-01-07T21:07:05+5:302022-01-07T23:39:56+5:30
Sugar Factories in Maharashtra : त्यानुसार शाहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा दिलासा दिला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स चौकशीचे सावट दूर झाले असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे.
मुंबई - गेल्या ३५ वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अधिकची रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सच्या चौकशीची टांगती तलवार होती. तसेच त्यामधून सुमारे ९ हजार कोटी रुपयांची वसुली होणार होती. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांसह सहकारमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित शाहांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शाहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा दिलासा दिला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स चौकशीचे सावट दूर झाले असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री अमित शाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळत मागील ३५ वर्षाचे जे इन्कम टॅक्सचे संकट होतं ते पूर्णपणे दूर केले आहे. या संदर्भातील नोटिफिकेशन आज निघालं आहे, त्याबद्द्ल त्यांचे आभार मानतो. याबाबत रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, राज्यातील सहकारामधील आघाडीचे नेते आणि मी स्वत: असे आम्ही सर्वजण अमित शहा यांना भेटलो होतो. गेली ३५ वर्षे ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले अशा साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सची टांगली तलवार लटकलेली आहे. तसेच ९ हजार कोटींची वसुली शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिले म्हणून कारखान्यांकडून करण्यात येणार होती, हा एकप्रकारचा अन्यास आहे, ही बाब आम्ही अमित शाहांच्या लक्षात आणून दिली होती. त्यावेळी अमित शाहा यांनी याच्यावर सरकार निर्णय़ करेल असे आश्वासन दिले होते.
साखर कारखान्यांना दिलासा देणारा अतिशय मोठा निर्णय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री मा.अमित भाई शाह यांनी घेतला. मी त्यांचा अतिशय आभारी आहे!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 7, 2022
प्राप्तिकर नोटिसींचा 35 वर्षांपासून प्रश्न रेंगाळला होता. त्यावर त्वरेने निर्णय झाला.@narendramodi@amitshahpic.twitter.com/kK1CUG8j2p
त्यानुसार तातडीने पावले उचलून हा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना अधिक पैसे देण्यासाठी साखर कारखान्यांना एक प्रकारचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. यामुळे साखर कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. या निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शाहा आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.