राज्यात सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापणार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:44 AM2022-10-29T11:44:07+5:302022-10-29T11:44:18+5:30

महाराष्ट्रात सुमारे सहा लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रिक तयार आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis to set up cyber intelligence unit in state | राज्यात सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापणार - देवेंद्र फडणवीस

राज्यात सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापणार - देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

मुंबई : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड (हरियाणा) येथील चिंतन शिबिरात दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिरात फडणवीस म्हणाले की, सायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल.

सरकारी आणि खासगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलीस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलीकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणाऱ्या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल.

महाराष्ट्रात सुमारे सहा लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रिक तयार आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात
आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

Web Title: Devendra Fadnavis to set up cyber intelligence unit in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.