'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 08:56 PM2023-06-18T20:56:48+5:302023-06-18T20:57:08+5:30

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.'

Devendra Fadnavis Uddhav Thackeray: 'Who were you, what happened to you', Devendra Fadnavis's criticism of Thackeray | 'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

googlenewsNext

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'देवेंद्रजी तुमची परिस्थीती खूप हालाखीची आहे, तुमचे अपमान होत आहेत. ते तुम्हाला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, कारण वरुन आदेश आहे,' असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सहन होत नाही अन्...

देवेंद्र फडणवीस यांची आज अकोल्यात सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरे आज काय काय बरळले, मला कधी कधी त्यांना म्हणावंसं वाटतं, कोण होतास तू, काय झालास तू. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणार, असे उध्दव ठाकरे सतत टेप वाजवित असतात. सध्या त्यांची कुठेकुठे आग होत आहे, हे त्यांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही,' अशी टीका फडणवीसांनी केली.

कोण होतास तू, काय झालास तू

ते पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंच्या पक्षातून रोज लोक जातात, त्यांना कळत नाही. खुर्चीसाठी ठाकरे काँग्रेस-एनसीपी सोबत गेले, त्यांचे दुकान आम्ही बंद केले. सध्या त्यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू अशी झाली आहे. जे घरी बसतात त्यांना मोदी शहा काय कळणार. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं की, मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊं. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.'

मोदींनी 100 देशांना लस दिली

'जगातील फक्त 5 देश कोविडची लस बनवू शकले, त्यात भारताचे नाव आहे. मोदींनी लस दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. मोदींनी 100 देशांना लस दिली. मी मॉरिशसला गेलो होतो, तिथले राष्ट्रपती म्हणाले, मोदींमुळे आमचा देश जिवंत आहे. शंभर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांगतात, मोदींमुळे आमचे देश जिवंत आहेत. G-20 मध्ये मोदी जातात, तिथल्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती म्हणतात मोदींची सही मागतात. सगळ्या आखाती देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या सर्वोच्च सन्मान त्यांनी मोदींना दिला, हा खऱ्या अर्थाने भारताचा सन्मान आहे,' असंही फडणवीस म्हणाले.

वटवृक्ष हटवू शकत नाही

'देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष हटवू शकत नाही. गेल्या वेळी 52 नेते एकत्र आले होते आता त्यात उधव ठाकरे यांची ही भर पडली आहे,' असा खोचक टोलाही फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.
 

Web Title: Devendra Fadnavis Uddhav Thackeray: 'Who were you, what happened to you', Devendra Fadnavis's criticism of Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.