"...म्हणून गाणंही शिकता आलं," डॉक्टर का झाले नाही; Amruta Fadnavis यांनी सांगितला तो किस्सा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 09:56 AM2021-10-09T09:56:53+5:302021-10-09T10:00:40+5:30
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी उलगडला त्यांचा जीवनप्रवास. सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते Axis Bank च्या व्हाईस प्रेसिडेंट असा प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची ओळख जशी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अशी आहे, तशी त्यांची स्वतंत्र ओळखही आहे. त्या एक बँकर अॅक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट, गायिका म्हणूनही सर्वांच्या परिचयाच्या आहेत. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत फेस टू फेस या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी आपण आई-वडिलांप्रमाणे डॉक्टर का झालो नाही आणि बँकिंग क्षेत्राकडे कसे वळलो, असा आपला जीवनप्रवास उलगडला आहे.
"घरी जेव्हा घरी सर्वजण आम्ही जेवायला एकत्र बसायचो तेव्हा आई वडिल हे दोघंही कामादरम्यान काय झालं याची चर्चा करायचे. त्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. मी त्याच वेळी ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं नाही," असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मजेशिर गोष्टी वेगळीकडे, पण त्यात परफेक्शन असावं लागतं. काही गोष्टी त्यासाठी आवश्यक असतात त्या माझ्याकडे नव्हत्या आणि खर्च वगैरे इतर गोष्टीही आहेत त्याकडे लक्ष होतं. कॉमर्स घेतल्यामुळे मला गाणं शिकणं, टेनिस खेळणं या गोष्टी सुरू ठेवता आल्या. डॉक्टर म्हणून ते करता आलं नसतं, असंही त्या म्हणाल्या.
असा झाला बँकिंग क्षेत्रात प्रवेश
"कॉमर्स आणि एमबीए करताना कॅम्पसमध्ये जो बेस्ट जॉब मिळेल तो अनुभवासाठी घ्यायचा असा विचार केला होता. त्याच पद्धतीनं कॅम्पसमध्ये अॅक्सिस बँकेचा जॉब मिळाला. त्या ठिकाणी काम करण्यासही आनंद मिळत होता. सारखी माझी डिपार्टमेंट्सही बदलली. कॅशपासून ट्रेजरी, ब्रान्च हेड, वेल्थ मॅनेजर अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला," असंही त्या म्हणाल्या. हा अनुभव आपल्याला जीवनातही कामी आला असं फडणवीस म्हणाल्या.