संसदपटूंना गौरवल्याशिवाय सभागृहाचा दर्जा वाढणार नाही - देवेंद्र फडणवीस

By admin | Published: August 3, 2016 07:22 PM2016-08-03T19:22:56+5:302016-08-03T20:19:37+5:30

चांगल्या संसदपटूंना जोपर्यंत गौरवले जात नाही, तोपर्यंत सभागृहाचा दर्जा वाढणार नाही, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे

Devendra Fadnavis will not increase the status of the house without the glory of Parliamentarians - | संसदपटूंना गौरवल्याशिवाय सभागृहाचा दर्जा वाढणार नाही - देवेंद्र फडणवीस

संसदपटूंना गौरवल्याशिवाय सभागृहाचा दर्जा वाढणार नाही - देवेंद्र फडणवीस

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याचं कौतुक करताना चांगल्या संसदपटूंना जोपर्यंत गौरवले जात नाही, तोपर्यंत सभागृहाचा दर्जा वाढणार नाही, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. मान्यवरांनी दिपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
 
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, नारायण राणे, दिलीप वळसे पाटील, गणपतराव पाटील, वर्षा गायकवाड, आमदार तारासिंग, दामोदर तांडेल, पंकजा मुंडे, निलम गो-हे, प्रधान सचिव आनंद कळसे, आमदार इम्तियाज अली, वारिस पठाण, प्रकाश अबिटकर, डीसीपी मनोज कुमार शर्मा, अमीन पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजकुमार बडोले, पंकजा मुंडे, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, वर्षा गायकवाड, अजित सावंत, शिवाजीराव देशमुख, धनंजय मुंडे, हरिभाऊ बागडे, विद्याताई चव्हाण उपस्थित आहेत. 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
 
राहूल नार्वेकर यांचा सर्वोत्कृष्ट नवोदीत आमदार पुरस्काराने गौरव
 

Web Title: Devendra Fadnavis will not increase the status of the house without the glory of Parliamentarians -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.