"पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशी पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:03 PM2022-06-21T17:03:56+5:302022-06-21T17:04:19+5:30

एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत

Devendra Fadnavis will perform this year's Ashadi Ekadashi Pooja as Chief Minister in Pandharpur - BJP Jaykumar Gore | "पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशी पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील"

"पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशी पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील"

Next

सातारा - शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिंदे यांच्यासोबत २५ हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलावलेल्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत केवळ १८ शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

त्यातच महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून लवकरच राज्यामध्ये भाजपची सत्ता येईल आणि येत्या आषाढीच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील असे भाकीत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे. 

आमच्या आमदारांचा खूनही होऊ शकतो - शिवसेना
एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत. त्यांनतर मीडियाशी बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी असे प्रस्ताव शिवसेना स्वीकारत नाही, शिवसेनेत तसं चालत नाही. शिवसेनेच्या आमदारांचा खून होऊ शकतो. अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केली असून अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाले आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.

"गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच"
शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे वर्षावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता हळूहळू शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिक म्हणाले की, गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. ते मुंबईत कसं पाऊल ठेवताय हे बघूच. विधानभवनात त्यांना यायवच लागेल असं शिवसैनिक म्हणाले त्याचसोबत उद्धवसाहेबांनी आदेश द्यावे या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. 
 

Web Title: Devendra Fadnavis will perform this year's Ashadi Ekadashi Pooja as Chief Minister in Pandharpur - BJP Jaykumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.