Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीची पाच जणांना धडक; पोलिसही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 08:55 PM2021-10-03T20:55:52+5:302021-10-03T21:04:30+5:30
Devendra Fadnavis's convoy car Accident: गेल्या तीन महिन्यांतील फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलैला मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली होती. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले होते.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा-मुखेड रोडवरील बेळी फाटा येथे रविवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली. (Devendra Fadnavis convoy car accident again in three months; five injured in Nanded. )
गेल्या तीन महिन्यांतील फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलैला मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली होती. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले होते. ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले होते.
आज देवेंद्र फडणवीस हे लातूर, नांदेडच्या दौऱ्यावर होते. बेरळी येथे राजे छत्रपती अकॅडमी जवळ ताफ्यातील वाहनाने एका पोलिसासह दोन मोटरसायकल आणि एका मालवाहू जीपला धडक दिली. जिवीत हानी झालेली नसली तरी पाच जणांनाही दुखापत झाली आहे. गडगा ते मुखेड जाताना अपघात झाला. बालाजी शंकर पवार (वय २६ रा.मांजरी, ता.मुखेड), राजेश व्यंकटराव जाधव (वय ३६, रा.मुखेड), जमादार नामदेव सायबू दोसलवार, समीर भीसे (वय ३७) व अरविंद मोरे (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत. बेरळी फाट्यावर हा अपघात झाला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम रातोळीकर, माधवराव साठे, बालाजी बच्चेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.