देवेंद्र फडणवीसांची दूरदर्शनवर "मन की बात"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 03:31 PM2017-04-05T15:31:15+5:302017-04-05T15:42:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - "मन की बात" या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेद्रं मोदी भारतातील जनतेसी संवाद साधतत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. "मन की बात" या कार्यक्रमाच्या संकल्पनेवर मुख्यमंत्र्यांचा विशेष कार्यक्रम आधारित असेल. पंतप्रधान हे रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. तर मुख्यमंत्री दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट राज्यातील शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
येत्या रविवारपासून हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. यासाठीचा पायलट एपिसोड नुकताच शूट करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांकडून व्हॉट्स अॅप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्न मागवण्यात आले होते. व्हॉट्स अॅपवरून सुमारे 18000 प्रश्न-सूचना आल्या, तर 1250 ई-मेल आले. त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली. राज्याच्या विविध भागांतून 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी मंत्रालयात बोलावण्यात आलं होतं.
गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधक आणि शिवसेना भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून सरकारला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न केलं. काल उत्तर प्रदेशात आदित्यनाथ योगी सरकारने आपल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केलं आहे. युपीतील कर्जमाफीनंर फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशात कर्जमाफी शक्य आहे, महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेबरोबरच विरोधकांनाही पडला आहे.