देवेंद्र फडणवीसांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांवर लवकरच चित्रपट; अवधूत गुप्तेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:14 AM2022-10-29T11:14:53+5:302022-10-29T11:16:03+5:30
'जनकल्याणासाठी झटला हा नेता' हे महाजनांवरील गीत त्यांनी सादर केले.
जामनेर - झेंडा चित्रपटात कार्यकर्त्यांची व्यथा मांडली होती, ग्रामविकास, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचा एकमेव झेंडा घेतल्याने ते सलग ६ टर्म निवडून आले. सध्याच्या राजकारणात हे शक्य नाही, त्यांच्यावर चित्रपट काढावा असे वाटते, असे गायक आणि चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी येथे बुधवारी रात्री झालेल्या स्वरसंध्या कार्यक्रमात सांगितले.
दिवाळी पाडवा व भाऊबीजेचे औचित्य साधून गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीने स्वरसंध्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्षा साधना महाजन अँड. शिवाजी सोनार व छगन झाल्टे यांनी कलावतांचे स्वागत केले.
'जनकल्याणासाठी झटला हा नेता' हे महाजनांवरील गीत त्यांनी सादर केले. गुप्ते यांनी महाजनांशी संवाद साधताना थेट विचारले, राज्यातील सत्तांतरामागे जे घडले त्या मागे तुमचा हात होता, असे मुंबईत बोलले जाते. यावर महाजन यांनी सांगितले की, यात माझा खारीचा वाटा होता. माझ्या कामामुळे ट्रबल शूटर म्हणविला गेलो. जामनेरला राज्यातील नंबर एकचे शहर होते. करायचे आहे. अंबानी म्हटले २५ कोटी न्या; पण चांगले क्रीडा संकुल करा. येत्या वर्षभरात सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुलाची उभारणी होईल, असे महाजन यांनी सांगितले.
एकच झेंडा हिंदुत्वाचा, भाजपचा प्रवासाची सुरुवात शालेय जीवनापासून झाली, रा.स्व. संघ, अभाविप ते भाजप असा प्रवास, पहिल्या निवडणुकीत राजांसमोर लढणे कठीण होते, मात्र जिंकलो, एकदा नव्हे दोनदा नाही तर सलग ६ वेळा जिंकलो, मतदारांनी प्रेम दिले, जि. प. निवडणुकीत साधना महाजन निवडून आल्या. शेव-मुरमुरे खाऊन कार्यकर्त्यांनी प्रचार केला, आता मात्र प्रचाराची व कार्यकर्त्यांचीही परिस्थिती बदलली आहे. एकच झेंडा हिंदुत्वाचा, भाजपचा हाती घेतल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास आमदार, अधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.