देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार, नवाब मलिकांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 11:39 AM2021-11-11T11:39:39+5:302021-11-11T11:40:05+5:30

Mumbai Drugs Case: घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना Nawab Malik यांची कन्या Nilofar Malik-Khan हिने आज कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच Devendra Fadnavis यांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis's problems will increase, Nawab Malik's daughter Nilofar Malik-Khan sent legal notice | देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार, नवाब मलिकांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार, नवाब मलिकांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

googlenewsNext

मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याचा, तसेच त्यांच्या जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा केला होता. दरम्यान आरोप प्रत्यारोप करत असतानाच नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले होते. दरम्यान, आता या आरोप-प्रत्यारोपावरून देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक हिने आज कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी म्हटले आहे की, खोटे आरोप एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहोत, हे जाणून घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबत केलेले खोटे दावे आणि विधानांबाबत केली होती. त्याबाबत ही मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. आता या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही, असेही निलोफर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला. ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली. बहुतेक मंत्र्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. 

Web Title: Devendra Fadnavis's problems will increase, Nawab Malik's daughter Nilofar Malik-Khan sent legal notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.