उपचाराअभावी देवळीकरांचा जीव कासावीस

By admin | Published: October 19, 2016 01:31 AM2016-10-19T01:31:05+5:302016-10-19T01:31:05+5:30

आरोग्य सेवेतील रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असून ही रिक्त पदे भरण्याबाबत नागरिकांनी देव पाण्यात ठेवले आहे

Devuliar's life is a cause of relief | उपचाराअभावी देवळीकरांचा जीव कासावीस

उपचाराअभावी देवळीकरांचा जीव कासावीस

Next


भिगवण : कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत भिगवण येथे कोणत्याही फटाका व्यापाऱ्याला उघड्यावर फटाका विक्रीसाठी परवाना दिला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी नीलकंठ राठोड यांनी भिगवण येथील व्यापाऱ्यांना दिले.
दिवाळी सणासाठी फटाका विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक भिगवण पोलीस ठाणे येथे आयोजिली होती. या वेळी जमलेल्या व्यापाऱ्यांना राठोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. दिवाळी सण हा आनंद साजरा करण्याचा सण आहे. परंतु योग्य ती काळजी न घेतल्यास अनर्थ घडू शकतो.
यासाठी कोर्टाने उघड्यावर आणि मनुष्यवस्तीत फटाका व्यवसायास परवानगी देऊ नये, असा आदेश दिला आहे. याची फटाका व्यावसायिकांना माहिती मिळावी, तसेच परवानगी देताना कराव्या लागणाऱ्या
अटीची माहिती व्हावी, यानिमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी भिगवण बाजारपेठेतील व्यापारी महेंद्र बोगावत, नारायण खेसे, रवींद्र रायसोनी, नितीन सावंत,
किरण रायसोनी, मुकेश ललवाणी, संतोष सोनावणे, गिरीश कुसुमकर, गुरुदत्त भोंग बैठकीसाठी उपस्थित होते.
या वेळी राठोड यांनी सर्व फटाका व्यवसाय करणाऱ्यांना एकाच जागी दुकाने लावावीत, असे आवाहन करीत नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस ठाण्याकडून परवानगी दिली जाणार नाही, असे सांगितले.
रतिलाल चौधर यांनी जमलेल्या व्यापारीवर्गाचे आभार मानले.
(वार्ताहर)

Web Title: Devuliar's life is a cause of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.