देवयानी खोब्रागडे आठवलेंच्या सचिव
By Admin | Published: July 15, 2016 02:37 AM2016-07-15T02:37:17+5:302016-07-15T02:37:17+5:30
भारताच्या न्यू यॉर्कमधील माजी डेप्युटी कौन्सिल जनरल देवयानी खोब्रागडे यापुढे समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खासगी सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या न्यू यॉर्कमधील माजी डेप्युटी कौन्सिल जनरल देवयानी खोब्रागडे यापुढे समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खासगी सचिव म्हणून काम पाहणार आहेत. देवयानी यांच्या नियुक्तीचे पत्र काढण्यात आले.
देवयानी या निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत. उत्तम खोब्रागडे हे सध्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. देवयानी या १९९९च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी असून, न्यू यॉर्कमध्ये असताना आपल्याकडील घरकाम करणाऱ्या महिलेविषयी व्हिसा प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची अडीच लाख डॉलर्सच्या बाँडवर सुटका करण्यात आली होती. देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध त्या वेळी खूपच कटू झाले होते.