चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी डीजीएमओ स्तरावरची प्रक्रिया - संरक्षणमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2016 03:08 PM2016-10-02T15:08:58+5:302016-10-02T15:08:58+5:30
मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे महासंचालक (डीजीएमओ) त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २ : अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे महासंचालक (डीजीएमओ) त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे स्वच्छ भारत उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्रीकर सहभागी झाले होते. यावेळी पर्रीकरांनी ही माहिती दिली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याचा काही संबंध नाही. चुकून ताबारेषा ओलांडून समोरील देशाच्या हद्दीत गेलेल्या जवानांना परत पाठविण्यासाठी स्टॅण्डर्ड मेकॅनिझम ही कार्यपध्दती पूर्वीपासूनच आहे. चंदू चव्हाण यांनीही चुकून ताबारेषा ओलांडली आहे. त्यांना परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जात आहे,असे पर्रीकर यांनी सांगितले.
पर्रीकर म्हणाले, भारतीय हवाई दलासाठी राफेल ही अत्याधुनिक विमाने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. करारानुसार ही विमाने ३६ महिन्यात भारतीय हवाई दलात समाविष्ट होणे आवश्यक आहे. परंतु, त्यापूर्वीच काही महिने ही विमाने भारतीय हवाई दलात दाखल होतील