धानाला मिळणार २०० रुपये जास्त
By admin | Published: January 11, 2017 04:54 AM2017-01-11T04:54:06+5:302017-01-11T04:54:06+5:30
केंद्र सरकारने २०१६-१७ मध्ये निश्चित केलेल्या धानाच्या (भात) आधारभूत किमतीपेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल
मुंबई : केंद्र सरकारने २०१६-१७ मध्ये निश्चित केलेल्या धानाच्या (भात) आधारभूत किमतीपेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला.
केंद्राने साधारण धानासाठी १ हजार ४७० तर अ ग्रेड धानासाठी १ हजार ५१० रुपये असा प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. त्यावर क्विंटलमागे २०० रुपये प्रोत्साहन रक्कम प्रति शेतकरी ५० क्विंटलपर्यंत धनादेशाद्वारे दिली जाईल. २४ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान खरेदी करण्यात आलेल्या धानासाठी ही रक्कम दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतंर्गत मंडलिनहाय भरपाईची जी रक्कम देय असेल त्या रकमेच्या ५० टक्के रक्कम शासनाकडून मदत म्हणून देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)