धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; ट्विटरवरून दिली तब्येतीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 04:17 PM2020-11-10T16:17:44+5:302020-11-10T16:34:42+5:30

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

Dhananjay Munde admitted to Lilavati Hospital; Health information given from the twitter | धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; ट्विटरवरून दिली तब्येतीची माहिती

धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; ट्विटरवरून दिली तब्येतीची माहिती

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. परळी, बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास, अनेक लोकांशी थेट संपर्क यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामकाजाचा अहवाल त्यांनी कोरोना वॉर्डमधून सादर केला होता. कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे  उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. 

धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (10 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच तब्येतीची माहिती दिली आहे. "तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल" असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धनंजय मुंडेंवर उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर मुंडेंना डिस्चार्ज देण्यात आला होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

Web Title: Dhananjay Munde admitted to Lilavati Hospital; Health information given from the twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.