jnu attack: विद्यादान होणाऱ्या परिसरात हल्ले होणे दुर्दैवी बाब: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 02:54 PM2020-01-06T14:54:00+5:302020-01-06T14:57:42+5:30
अराजकतेचा निषेध म्हणत मुंडे यांनी केंद्रसरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करत केंद्रसरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी-शिक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. विद्यादान होणाऱ्या परिसरात असे हल्ले होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हंटलय. देशातील तरुण पिढीपुढे हे कसले 'आदर्श' निर्माण केले जात आहेत?, अशा अराजकतेचा निषेध म्हणत मुंडे यांनी केंद्रसरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी-शिक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. विद्यादान होणाऱ्या परिसरात असे हल्ले होणे ही दुर्दैवी बाब आहे. देशातील तरुण पिढीपुढे हे कसले 'आदर्श' निर्माण केले जात आहेत? अराजकतेचा निषेध! #SOSJNU#JNUattack#JNUUnderAttack
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 6, 2020
जवाहर लाल नेहरु विद्यापीठात चेहरा झाकलेल्या जवळपास 50 गुडांच्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावाने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. जेएनयूतील हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे अभाविपच्या नेत्यांनी डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.