धनंजय मुंडे समर्थकांकडून नामदेव शास्त्रींना धोका?
By admin | Published: January 10, 2015 01:32 AM2015-01-10T01:32:21+5:302015-01-10T01:32:21+5:30
धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार गडाच्या सेवेकऱ्याने पाथर्डी पोलिसांत दिली आहे.
पाथर्डी (अहमदनगर) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार गडाच्या सेवेकऱ्याने पाथर्डी पोलिसांत दिली आहे.
५ जानेवारीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गडावर बाबांच्या दर्शनासाठी आले होते. तेथे जमावाने त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यामुळे मुंडे दर्शन न घेता गडावरून परत फिरले होते. त्यापार्श्वभूमीवर महंतांना दगडफेकीच्या घटनेबाबत धमकीचे फोन येत आहेत. धनंजय मुंडे यांनी मात्र यामागे राजकारण असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भगवानगडावर मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर मुंडे यांनी या घटनेस भाजपाच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले होते. त्याचा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी इन्कार केला होता.