दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:52 IST2025-01-16T07:51:47+5:302025-01-16T07:52:53+5:30
पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंडेंसाठीच वाल्मीक कराडने माया जमवली आहे. बहुतेक धनंजय मुंडे यांनी सांगितले म्हणून परळीमध्ये आंदोलन सुरू आहे.

दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील
वडीगोद्री (जि. जालना) : खंडणी आणि खुनातले आरोपी एकच आहेत. ही केस अंडर ट्रायल झाली पाहिजे. जातिवाद आणि दंगली घडवून आणणारी प्रचंड मोठी टोळी धनंजय मुंडे यांची असल्याची टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. बुधवारी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंडेंसाठीच वाल्मीक कराडने माया जमवली आहे. बहुतेक धनंजय मुंडे यांनी सांगितले म्हणून परळीमध्ये आंदोलन सुरू आहे. मात्र, मराठ्यांनी शांत राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणीही त्यांनी केली.