धनंजय मुंडेंवर दावा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:24 AM2017-07-31T03:24:22+5:302017-07-31T03:24:26+5:30
एका शेतक-याच्या नावावर ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचल्याचा आरोप केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार
परभणी : एका शेतक-याच्या नावावर ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचल्याचा आरोप केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गंगाखेड शुगरचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत एका शेतकºयाच्या सातबारावर ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप गुट्टे यांच्यावर यांच्यावर केला होता. गुट्टे यांनी विधानपरिषदेत सादर केलेली सातबारा आणि फेरफार उतारा पत्रकारांसमोर दाखविला. ते म्हणाले, दादाराव सीताराम पंडित या शेतकºयाचा हा सातबारा असून यावर पंडित यांच्या नावे १ लाख रुपयांचे कर्जाचा बोजा दाखविला आहे. तर तर याच गट नंबरमध्ये असलेल्या गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी प्रा.लि. सुनील रत्नाकर गुट्टे तर्फे मुख्त्यारआम योगेंद्र अन्नालाल पटेल यांच्या नावे ५०२ कोटी ४० लाख रुपयांचा बोजा दाखविला आहे. त्याचा तपशील फेरफारमध्ये दिला असून हे कर्ज सर्व्हे नं.१५५, १५६, १५८, १६०, १६१, १६७, १७८ आणि १७९ या सर्व्हे नंबरवरील जमिनीवर बोजा असल्याचे नमूद केले आहे. दादाराव पंडित यांची जमीन या सर्व्हे नंबर लगत असल्याने त्यांच्या सातबारावर हा कर्जाचा उल्लेख आला आहे. तसेच २९ जुलै रोजी तलाठी सज्जातून काढलेल्या प्रमाणपत्रावरही मौजे पोखर्णी ता.गंगाखेड येथील गट नं.१६१ मध्ये दादाराव पंडित यांच्या नावे सातबारा नोंदीप्रमाणे या जमिनीवर कोणतेही कर्ज नाही. गट नं.१६१ वर गंगाखेड शुगर एनर्जी प्रा.लि. नावे फेर क्रमांक ९०३ नुसार ५०२ कोटी रुपयांचे कर्ज
आॅनलाईन नोंदीप्रमाणे आहे. त्यामुळे विधानपरिषदेत मुंडे यांनी केलेला आरोप चुकीचा असून याविरुद्ध आपण १ हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.