कोल्हापुरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड

By admin | Published: February 7, 2017 01:18 AM2017-02-07T01:18:08+5:302017-02-07T01:18:08+5:30

आज छाननी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी विक्रमी २,४४६ अर्ज दाखल

Dhanbad to fill up the nominations in Kolhapur | कोल्हापुरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड

कोल्हापुरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी जिल्ह्यातून विक्रमी १४९७ इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ५०७ व पंचायत समितीसाठी ९९० अर्जांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी एकूण ८९८, तर पंचायत समितीसाठी एकूण १५४८ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची आज, मंगळवारी छाननी होणार आहे.
पाच दिवसांच्या तुलनेत सोमवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून सावध पवित्रा घेत सोमवारी अधिकृत उमेदवारांना पक्षाचे ‘ए. बी.’ फॉर्म देण्यात आले. (प्रतिनिधी)


बंडखोरी टाळण्यास जोडण्या
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.-वृत्त/हॅलो १
बोरवडेतून वीरेंद्र मंडलिकच
कागल तालुक्यातील बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीवरून सोमवारी वेगळेच नाट्य घडले. या मतदारसंघातून इच्छुक मंडलिक गटाचे भूषण पाटील यांनी चक्क ‘मातोश्री’वरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ए बी’ फॉर्म आणल्याची चर्चा उसळली, परंतु अखेर येथे शिवसेनेकडून मंडलिक यांचे नातू व संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र यांचीच उमेदवारी निश्चित झाली. -वृत्त/२


अखेरच्या दिवशी दाखल अर्ज
तालुकाजि.प.पं.स.
शाहूवाडी१८३१
पन्हाळा४७८२
हातकणंगले५९ १३९
शिरोळ६६१२५
कागल३३६४
करवीर७८ १५८
गगनबावडा१५२५
राधानगरी३३८४
भुदरगड४०७६
आजरा११ २२
गडहिंग्लज५९१०६
चंदगड४८७८
एकूण५०७९९०

Web Title: Dhanbad to fill up the nominations in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.