रस्त्याच्या कामांवर यापुढे पडणार ‘धाडी’
By admin | Published: February 5, 2016 03:53 AM2016-02-05T03:53:37+5:302016-02-05T03:53:37+5:30
ठेकेदारांसाठी सोन्याची अंडी ठरलेल्या रस्ते विभागातील घोटाळे उघड झाल्यामुळे आता रस्त्याच्या प्रत्येक कामावर महापालिकेची करडी नजर असणार आहे़ रस्त्यांच्या कामामध्ये दर्जेदार सामानाचा वापर होत
मुंबई : ठेकेदारांसाठी सोन्याची अंडी ठरलेल्या रस्ते विभागातील घोटाळे उघड झाल्यामुळे आता रस्त्याच्या प्रत्येक कामावर महापालिकेची करडी नजर असणार आहे़ रस्त्यांच्या कामामध्ये दर्जेदार सामानाचा वापर होत असल्याची खातरी करण्यासाठी आकस्मिक धाडही टाकण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे़
रस्ते विभागामधील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सप्टेंबर २०१५मध्ये उघड झाला़ ठेकेदारांच्या सिंडिकेटने या संपूर्ण विभागालाच पोखरले आहे़ त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्पात मोठी तरतूद मिळवणाऱ्या रस्ते विभागाच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे़ असे असतानाही मुंबईतील रस्त्यांच्या सुधारणेसाठी २८०६़८० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे़
मात्र अर्थसंकल्पातून मोठी रक्कम रस्त्यांसाठी खर्च होत असताना त्यांच्या दर्जाची खातरी करून घेण्याची ताकीदही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे़ त्यानुसार रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात येईल़ यामुळे ठेकेदारांवरही वचक राहून चांगले रस्ते तयार होतील, असा विश्वास आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केला आहे़ (प्रतिनिधी)शहरातील ५२ जंक्शनवर १२० कोटी खर्च करून सुधारणा करण्यात येणार आहे; तर पश्चिम उपनगरात ४५ जंक्शनवर ५५ कोटी आणि पूर्व उपनगरात २५ जंक्शनवर २६ कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाद्वारे मजबूत करण्यात येणार आहेत़ चार महिन्यांमध्ये हे काम होणार असून यामुळे वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास पालिकेला वाटतो़हँकॉक पुन्हा उभा राहणार
नुकताच पाडण्यात आलेला रेल्वेचा पुरातन हँकॉक उड्डाणपूल पुन्हा बांधण्यात येणार आहे़ यासाठी २८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ या कामासाठी पालिकेने निविदा मागविल्या आहेत़ अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़आता रस्त्यांची कामे दिवसा
रस्त्यांची कामे रात्रीच करण्याची परवानगी मिळत असल्याने कामे रखडून पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते़ परंतु पहिल्यांदाच दिवसाही रस्त्यांचे काम करण्याची परवानगी वाहतूक पोलिसांनी दिली आहे़ त्यामुळे कामे नियोजित वेळेत व कमी कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल़ डांबरी रस्त्यांची सुधारणा
शहरात नगिनदास मास्टर रोड, डोंगराशी रोड, प्रतीक्षा नगर मुख्य रस्ता, जुना प्रभादेवी मार्ग, पश्चिम उपनगरात एमआयडीसी रोड, पाइपलाइन रोड, मढ गावातील मार्वे रोड, टी़पी़एस. रोड आणि पूर्व उपनगरात ए़एच़ वाडिया
रोड, रस्ता क्ऱ१० चेंबूर हे रस्ते सुधारणार
काँक्रिटीकरण - शहरातील एम़ जी़ रोड, ताडदेव रोड, आचार्य दोंदे मार्ग, जी़डी़ आंबेडकर मार्ग, वीरा देसाई मार्ग, अच्युतराव पटवर्धन मार्ग येथील रस्त्यालगतच्या पट्ट्याची सुधारणा व श्रद्धानंद रोडचे काँक्रिटीकरण़ घाटकोपर-मानखुर्द रोड, अंधेरी-घाटकोपर रोड, एल़ बी़ एस़ मार्ग आंतरराष्ट्रीय
दर्जाचे दिशादर्शक
आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामफलक व दिशादर्शक फलक बसविण्यासाठी निविदाही मागविल्या आहेत़ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही कामे सुरू होऊन वर्षभरात पूर्ण होतील़ यासाठी ९़६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ७़०१ कोटींची तरतूद केली.