डॉ.भामरेंच्या शपथविधीनंतर धुळ्यात आतीषबाजी

By admin | Published: July 5, 2016 12:08 PM2016-07-05T12:08:51+5:302016-07-05T12:09:18+5:30

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

Dhobhaye Dhobashan after Dr. Swaminathan's swearing | डॉ.भामरेंच्या शपथविधीनंतर धुळ्यात आतीषबाजी

डॉ.भामरेंच्या शपथविधीनंतर धुळ्यात आतीषबाजी

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. ५ - धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.  हा सोहळा पाहण्यासाठी डॉ. भामरे यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  डॉ. भामरे यांचा नंyर कधी येतोय याची सर्वानाच उत्सुकता लागून होती.  अखेर डॉ. भामरे यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.  तसेच निवासस्थाना समोर डफ लाऊन नाचत व फटक्यांची आतीषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.  डॉ. भामरे यांच्या कुटुंबियांनी देखील शपथ समारोह बघून समाधान व आनंद व्यक्त केला.

जळगावातील वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे. उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.

 

 

Web Title: Dhobhaye Dhobashan after Dr. Swaminathan's swearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.