विक्रमगड तालुक्यात धूम
By Admin | Published: August 26, 2016 02:34 AM2016-08-26T02:34:22+5:302016-08-26T02:34:22+5:30
गाव-खेडयापाडयासह नविन चाली रिती प्रमाणे तर काही भागात पुर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने गोपाळकाला थाटामाटात भक्तीपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़
विक्रमगड : विक्रमगड शहरासह तालुक्यातील डोल्हारी, सवादे, सुकसाळे, साखरे, दादडे, विक्रमगड, तलवाडा, आलोंडे, मलवाडा, भोपोली, उपराळे,बांधण,देहेर्जे आदी विविध गाव-खेडयापाडयासह नविन चाली रिती प्रमाणे तर काही भागात पुर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने गोपाळकाला थाटामाटात भक्तीपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ यावेळीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,विक्रमगड शहरातील चारही मुख्य नाक्यापासुन(बाजारपेठेपासुन)ते पूर्वीची जुनी बाजारपेठ,पाटीलपाडा आदी,परिसरात २५ ते ३० दहीहांडया बांधण्यात आल्या होत्या़ तरतालुक्यात १५० ते २०० हांडया बांधण्यात आल्या होत्या,त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे राजकीय पक्षासह, व्यापारी,पोलिस कार्यालय आदींचा समावेश होता़ यंदाही जयवंत पटेल यांनी थंडपेय असलेल्या कोकाकोलाची दहीहांडी उभारली होती हयावेळी मात्र गोविंदाचा जल्लोष साजरा करण्यास पावसाने ही दडी मारल्याने पावसाच्या संततधार हांडी फोडण्यात मजा येते जल्लोष असतो तो काहीसा कमी दिसत होता तरीही गोविंदा पथकांना मोठा आनंद मिळत होता़ आज सकाळी १२ वाजल्या पासुन विक्रमगड शहर परिसारात गोविंदा पथकांनी हांडया फोण्याचा कार्यक्रम सुरु केला ता ेसायंकाळी ५ पर्यत चालला व नंतर सर्व गोविंदा हांडया फोडुन शेवटी विक्रमगडच्या पंतगेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या देवळात आरतीकरुन काल्याचा आनंद घेतला व ख-या अर्थाने गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला़ गोपाळकाल्याच्या निमीत्ताने प्रमुख राजकीय पक्षांचे चौकात मंडप उभारुन शुभेच्छा देणारे फलक लावण्यांत आले होते, जन्माष्टमी साजरी करण्यास बाळ-गोपाळही सज्ज झालेले दिसत होते़ त्यामध्ये कुणी श्रीकृष्णाचे कपडे व पोखाष परिधान करुन आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता े़त्यामध्ये चिमुकली मुले खुप तेजवान व रुबाबदार दिसत होती.
>यंदा भाजयुमोची दहीहंडी ठरली मुख्य आकर्षण
विक्रमगड : जव्हार नाक्यावर यंदा नव्यानेच भाजपा युवामोर्चाच्या वतीने जिल्हाअध्यक्ष सुशील औसरकर यांचे मार्गदर्शनाखाली आकर्षक दहीहंडी उभारली होती. यावेळी डीजेच्या तालावर गोविंदा पथके धुंद झाली होती. पावसाने दडी मारल्याने घराघरातून गोविंदांवर पाण्याचा वर्षाव होत होता. मात्र वीस फुटांची हंडी फोडायला जवळ जवळ दिड तास लागला़ अथक प्रयत्नानंतर ही हंडी फोडण्यास गोविंद पथकांना यश आले़ ही हंडी विक्रमगडकरांचे मोठे आकर्षण ठरली़ ही हंडी सजविल्याने ती हंडी फोडतांना पाहाणा-यांची मोठी गर्दी जमली होती़ यामुळे गोविंदांनाही मोठा जोश चढला होता. या दरम्यान भाजपाच्यावतीने व्यासपीठ तयार केले होते़ त्यावर उपसभापती मधुकर खुताडे, जिल्हाउपाध्यक्ष महेश आळशी, निशिकांत संखे, न्यूजनेटवर्कचे प्रदोष आळशी, जयप्रकाश आळशी,मंगेश औसरकर,सागर आळशी,मनोहर भानुशाली आदी मान्यवरांची उपस्थिती होती़
>पारंपरिक उत्साह
या दहीहांडी उत्सवाची सर्व जबाबदारी विक्रमगडमधील सर्वात जुने सन्मित्र मंडळाचे व्यवस्थापक प्रफुल आळशी यांच्याकडे होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे दहीहांडया फोडण्यांत आल्या़ या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ दरम्यान तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात आपल्या पारंपारीक पध्दतीने दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यांत आला़