धुळे - ईदनिमित्त बाजारात अलोट गर्दी
By admin | Published: July 5, 2016 08:29 PM2016-07-05T20:29:14+5:302016-07-05T20:29:14+5:30
रमजान महिन्यानिमित्त सध्या लहानांपासून-थोरांपर्यंत मुस्लिम बांधवांमध्ये अलोट उत्साह दिसून येत आहे. शहरात गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे : रमजान महिन्यानिमित्त सध्या लहानांपासून-थोरांपर्यंत मुस्लिम बांधवांमध्ये अलोट उत्साह दिसून येत आहे. शहरात गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमिवर ईदच्या खरेदीसाठी पाचकंदिल परिसर व मौलवीगंज परिसरात मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. रमजान ईद गुरुवारी असले तरी शासकीय सुट्टी मात्र बुधवारीच राहणार आहे.
बुधवारी ३० रोजे पूर्ण
बुधवारी मुस्लिम बांधवांचे ३० रोजे पूर्ण होणार आहेत. बुधवारी सौदी अरेबियामध्ये ईद साजरी करण्यात येते. नेहमीच्या प्रथेनुसार सौदी अरेबिया येथे ईद साजरी झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे केली जाते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गुरुवारी ईद साजरी केली जाणार आहे. कारण इस्लामी धर्मशास्त्रानुसार चंद्र पाहून रोजे सुरू केले जातात, व चंद्र पाहून रोजाची समाप्ती केली जाते. रोजे पूर्ण झाल्यानंतर चंद्र दिसला नाही तरी ३० रोजे पूर्ण झाल्यानंतर रोजे साजरे करण्याचा नियम आहे. इस्लामी कॅलेंडरनुसार गुरुवारीच ईद असल्याचे शेख हुसेन गुरुजी यांनी सांगितले.
सुट्टी मात्र बुधवारीच...
ईद जरी गुरुवारी साजरी करण्यात येणार असली, तरी शासकीय कॅलेंडरनुसार बुधवारीच सुट्टी राहणार आहे. सुट्टीच्या बदला संदर्भात संध्याकाळपर्यंत वरिष्ठस्तरावरून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.