धुळे - चायना लायटिंगवर अघोषित बहिष्कार

By admin | Published: October 18, 2016 08:54 PM2016-10-18T20:54:34+5:302016-10-18T20:54:34+5:30

दिवाळीनिमित्त दरवर्षी चायना लायटिंगला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु चीनच्या भारतविरोधी भूमिकेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र

Dhule - Undeclared boycott on China lighting | धुळे - चायना लायटिंगवर अघोषित बहिष्कार

धुळे - चायना लायटिंगवर अघोषित बहिष्कार

Next

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 18 - दिवाळीनिमित्त दरवर्षी चायना लायटिंगला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु चीनच्या भारतविरोधी भूमिकेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचा परिणाम बाजारापेठेमध्ये दिसू लागला आहे. ग्राहकांनी चायना लायटिंगकडे पाठ फिरवलेली आहे, असे विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यंदा चायना लाईटींगची विक्री आताच ५० टक्केवर आली आहे. ग्राहकांचा चायना लाईटींगवर अघोषित बहिष्कार बघता पुढे यात आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
५० टक्के जास्त फटका
दिवाळीत यावर्षी चायना लायटिंगची विक्री सुरुवातीलाच गेल्यावर्षाच्या तुलनेत ५० टक्क्याने घट झाली आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे एक ते दीड कोटी रुपयाची चायना लायटिंगची उलाढाल होते. ती निम्म्यावर आली आहे.
अघोषित बहिष्कार
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. याला सर्व देशांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे, परंतु चीन अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुशिक्षित लोक आता चायना वस्तु घेण्याचे टाळू लागले आहेत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
भारतीय कंपन्यांचेही दर कमी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांनीही लायटिंगचे रेट कमी केले आहे. चायना लायटिंगच्या तोडीस तोड देणारी भारतीय कंपन्यांची लायटिंग बाजारात आलेली आहे. तसेच चायना लायटिंग ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ असून भारतीय कंपन्यांचा माल टिकाऊ असल्याचेही ग्राहक व विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुकानामध्ये ग्राहक भारतीय कंपन्यांचीच लायटिंग खरेदी करत असताना दिसून येत आहे.
चायनाचा स्टॉक निम्म्यावर
बाजारातील मागणीचा अंदाज बांधून विक्रेत्यांनीही गेल्यावर्षीपेक्षा लायटिंगचा निम्मा स्टॉक मागविला आहे. जिल्ह्यातील विक्रेते जेथून माल खरेदी करतात, त्याठिकाणच्या होलहोल विक्रेत्यांनीही यावर्षी चायना स्टॉक कमी केला असून, भारतीय कंपन्यांचा स्टॉक वाढविला आहे.
बाजाराची सद्यस्थिती
चायना लायटिंग २० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत तर इंडियन लायटिंग ५० रुपयापासून ३०० रुपयापर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहे. वीजेची बचत होत असल्याने एलईडी बल्बच्या लायटिंगला जास्त मागणी आहे.
सेलवरील दिव्यांची लायटिंग
विविध भारतीय कंपनीचे सेलवरील दिव्यांची लायटिंगही बाजारामध्ये आलेली आहे. लोकांची दिव्यांच्या माळा रोटेटिंग बल्ब लायटिंगला जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी लायटिंगमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत.

महाग असू द्या, पण इंडियन द्या
स्वदेशीबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसून येत आहे. ‘महाग असू द्या, पण भारतीय कंपनीचीच लायटिंग द्या’ अशी मागणी ग्राहक स्वत:हून करू लागले आहेत. अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. त्यामुळे चायना लायटिंगला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. चायना लायटिंग तोडीस-तोड म्हणून भारतीय कंपन्याही मोठ्या प्रमाणात बाजारात उतरल्या आहेत. त्यामुळे मागविलेला स्टॉकही संपतो का नाही, याबाबत विक्रेत्यांमध्ये साशंकता आहे.

यावर्षी चायना लायटिंग मागणी खूपच कमी आहे. ग्राहक स्वत:हून देशी कंपन्यांचा माल मागत आहेत. त्यामुळे वर्षी चायना मालाची विक्री निम्म्यापेक्षा जास्त घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चायना माल कमी मागविला आहे.
- अमित मंदान, विक्रेते

नव्वद टक्केपेक्षा जास्त ग्राहक चायना लायटिंग नको म्हणून सांगत आहेत. कमी किंमत असल्यामुळे काही लोक मजबूरी म्हणून हा माल खरेदी करतात. भारतीय कंपन्यांच्या लायटिंगलाच ग्राहकांची जास्त मागणी आहे.
- दिलीप जैन, विक्रेते

चायना लायटिंगपेक्षा आम्हाला भारतीय कंपन्यांची लायटिंग चांगली वाटते. स्वदेशी मालाकडे लोक वळले तर आपल्या देशाचाच फायदा होईल. तसेच आपल्या देशातील चलन बाहेर जाण्याचे थांबेल.
- विकास पाटील, ग्राहक

उरी येथे भारतीय सैनिक तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सर्वांचाच मनात खदखद आहे. आपण ज्यांच्या वस्तु विकत घेतो, त्यांनाच आपल्याविषयी संवेदना नसेल तर आपण भारतीय वस्तुच खरेदीवर बहिष्कार टाकला पाहिजे.
- अशोक चौधरी, ग्राहक

Web Title: Dhule - Undeclared boycott on China lighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.