सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्री: शिवेंद्रसिंहराजेंसह १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 03:17 AM2017-10-13T03:17:37+5:302017-10-13T03:17:58+5:30
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह २५० कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अशोका स्थापत्य कंपनीकडून मॅक्रोलाईन इंफ्रा कंपनीकडे हस्तांतर झाला. परंतु तेथील कामगारांना कामावरून काढू नये, यासाठी उदयनराजेंनी आपल्या समर्थकांसह धडक मारुन टोलनाका टोल फ्री केला होता. याचवेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या साताºयात हालचाली सुरू झाल्या होत्या.