राज्यात दिवसभरात २,४८७ रुग्णांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:51 AM2020-06-01T06:51:58+5:302020-06-01T06:52:06+5:30
राज्यात सध्या ३ हजार १५७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १८ हजार ४९० पथकांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात रविवारी २ हजार ४८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ८९ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २ हजार २८६ झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार ३१ अॅक्टिव्ह रुग्ण असून १ हजार २४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २९ हजार ३२९ आहे. एकट्या मुंबईत दिवसभरात १ हजार २४४ रुग्णांची नोंद झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या ३९,६८६, तर बळींचा आकडा १२७९ वर पोहोचला आहे.
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.७ दिवस होता, आता १७.५ झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्याचा मृत्यूदर ३.३७ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे ४३.३५ टक्के आहे. राज्यात रविवारी नोंद झालेल्या ८९ मृत्यूंमध्ये मुंबईतील ५२, नवी मुंबई ९, ठाणे ५, कल्याण-डोंबिवली ४, मालेगाव ६, पुणे ९, सोलापूर २, उस्मानाबाद १ आणि यवतमाळ १ या रुग्णांचा समावेश आहे. या ८९ मृत्यूंमध्ये ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. ५६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून त्यात ३४ हजार ४८० लोक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या ३ हजार १५७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १८ हजार ४९० पथकांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.ले आहे.
रशिया, भारतात नवे रुग्ण अधिक
२४ तासांत जगात कोरोनाचे जे ५० हजारांवर रुग्ण आढळले, त्यात रशिया (९३६३) व भारत (८ हजार) या दोन देशांतील १७ हजारांहून अधिक आहेत. त्या खालोखाल ब्राझील (३५४५) व पाकिस्तान (३०३९) यांचा क्रमांक आहे. जगातील रुग्णांची संख्या आता ६२ लाखांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा ३ लाख ७२ हजारांवर गेला आहे. बरे झालेल्यांची संख्या २७ लाख ६३ हजार झाली.