लीसा रे व अमृता देवेंद्र फडणवीस साधणार ‘लोकमत वुमेन समिट 2014’मध्ये संवाद

By admin | Published: November 26, 2014 11:36 PM2014-11-26T23:36:06+5:302014-11-26T23:36:06+5:30

लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित चौथ्या ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांचा सहभाग असणार आहे.

Dialogues in 'Lokmat Women Summit 2014' to be organized by Lisa Ray and Amrita Devendra Fadnavis | लीसा रे व अमृता देवेंद्र फडणवीस साधणार ‘लोकमत वुमेन समिट 2014’मध्ये संवाद

लीसा रे व अमृता देवेंद्र फडणवीस साधणार ‘लोकमत वुमेन समिट 2014’मध्ये संवाद

Next
पुणो : ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित चौथ्या ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांचा सहभाग असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस; तसेच ग्लॅमरस मॉडेल-अभिनेत्री लीसा रे या समिटमध्ये उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत. मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी हॉटेल हयात येथे ही एकदिवसीय समिट होणार आहे. 
 
4अमृता फडणवीस : अमृता फडणवीस या राज्याचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी आहेत. सध्या त्या नागपूर येथील अॅक्सीस बँकेच्या ‘सहयोगी उपाध्यक्ष’ म्हणून काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ही नोकरी सोडा, असे त्यांना अनेकांनी सुचविले. मात्र, प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्टय़ा स्वत: सक्षम असले पाहिजे, असे स्पष्टपणो सांगत त्यांनी नोकरी सोडण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून मिरविण्यापेक्षा त्या आपल्या कौटुंबिक व सामाजिक कर्तव्याला महत्त्व देतात. प्रत्येक महिलेने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला हवी, असेही त्या मानतात. लग्नापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. लग्नानंतर मात्र त्यांनी राजकारणी पतीला सवरेतोपरी सहकार्य केले.  नागपूरमधील प्रसिद्ध प्रसूतितज्ज्ञ चारू रानडे व नेत्ररोग तज्ज्ञ शरद रानडे यांच्या त्या कन्या आहेत. 
 
4लीसा रे : ग्लॅमरस चेहरा असलेली मॉडेल-अभिनेत्री लीसा रे यांनी जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात केली आहे, तेव्हापासून त्या कॅन्सरविषयी समाजात जनजागृतीही करीत आहेत. मॉडेल-अभिनेत्रीबरोबरच विविध सामाजिक कामांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कॅनडातील टोरांटो या शहरात त्यांचा जन्म झाला असून, त्यांचे वडील बंगाली आहेत, तर आई पोलिश आहे. मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या लीसा यांनी बॉलिवूडमध्ये 2क्क्1 साली ‘कसूर’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. दीपा मेहता यांच्या ‘वॉटर’ या वादग्रस्त चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेतून त्या अधिक प्रकाशझोतात आल्या. या चित्रपटासाठी त्यांना अभिनयाचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्याशिवाय इतर विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 
 

 

Web Title: Dialogues in 'Lokmat Women Summit 2014' to be organized by Lisa Ray and Amrita Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.