धुळ्यात अतिसार : नंदुरबारमध्ये २ हजार नमुने दूषित

By admin | Published: May 11, 2014 12:18 AM2014-05-11T00:18:07+5:302014-05-11T00:18:07+5:30

धुळे/नंदुरबार : शहरातील अनेक भागांमध्ये अतिसाराची लागण झाली आहे. त्यात ६० पेक्षा अधिक रुग्ण बाधित झाले आहेत.

Diarrhea in Dhule: 2 thousand samples of Nandurbar contaminated | धुळ्यात अतिसार : नंदुरबारमध्ये २ हजार नमुने दूषित

धुळ्यात अतिसार : नंदुरबारमध्ये २ हजार नमुने दूषित

Next

धुळे/नंदुरबार : शहरातील अनेक भागांमध्ये अतिसाराची लागण झाली आहे. त्यात ६० पेक्षा अधिक रुग्ण बाधित झाले आहेत. जिल्हा रुग्णालय, सार्वजनिक रुग्णालयासह काहींवर खासगीत उपचार सुरू आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तपासणी करण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पाण्याचे नमुने दूषित आढळून आल्याने जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात असल्याचे संकेत आहेत. मनपा आयुक्त दौलतखाँ पठाण तसेच पाणीपुरवठा विभागाचे ओव्हरसियर सी.एम. ओगले यांना विचारणा केली असता त्यांनी शहरात ठिकठिकाणी अतिसाराची लागण झाल्याची माहिती आता कळाल्याची प्रतिक्रिया दिली. रुग्णसंख्या वाढत असेल, तर स्थिती नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्यात येतील, जलवाहिन्यांची गळती काढली जाईल, असे या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. नगरसेवक अमिन पटेल यांनीही दीड महिन्यापूर्वी जलवाहिन्यांना गळती असल्याबाबत तक्रार दिल्याचे सांगितले. फुटक्या जलवाहिनींमध्ये गटारीचे पाणी मिसळत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाणीपुरवठा विभागाचे सी.सी. बागुल, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना स्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. नंदुरबारलाही बाधा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने गेल्या वर्षभरात म्हणजे मार्च २०१३ ते एप्रिल २०१४ या काळात नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर व धडगाव या तालुक्यातील ११ हजार २९९ पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. या नमुन्यांपैकी दोन हजार ३७ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. या पाण्यात जलजन्य आजार पसरवणारे थर्मोटोरंट आणि इकोलाईट हे दोन जंतू आढळून आले आहेत. रुग्णांची नावे अफसानाबानो अहमद (३६) रा.दिलदारनगर, अकील हसन (३२) रा.मोलवीगंज, आसिफ हुसेन (४०) रा.आझादनगर, रईसाबी बागवान (४०) रा.चंद्रमणी चौक, कबरूनिसा महम्मद सुलेमान (७३) रा. अकबर चौक, तायरा शेख मुझाद्दीन (४०) रा.वीटभट्टी, कुशिराबी शेख गयास (३५) रा.मौलवीगंज, कलीम अहमद अब्दुल वाहिद (४७) रा.माधवपुरा, हासनुरबी उसमान शहा (४०) रा.आझादनगर, कुबराबी मनमान (५५) रा.नेहरूनगर, सुनियाबानो महंमद मुस्तकान (२५) रा.दिलदानगर, सकिनाबानो अब्दुल रशीद अन्सारी (५२) रा.शंभरफुटी रोड, राज राम हैद्राबाद (२५) रा.रेल्वे स्टेशन रोड, बुकदादबी शेख सगीर (६१) रा. मौलवीगंज, महादू धर्मा अहिरे (५४) रा.पोलीस मुख्यालय, मुसहेब मो.नासीर (५ वर्ष) रा.दिलदारनगर, आसमा सिद्दीका साबीर खान (३ वर्ष) रा.मौलवीगंज, कुशिराबी गयास, सकिनाबानो, जुलेखा पिंजारी, सुमैया बानो, कबरूनिसा, अफसाना बानो, रईसाबी, आसिफ हुसेन, तायरा शेख यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Diarrhea in Dhule: 2 thousand samples of Nandurbar contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.