४०० कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ? - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 2, 2017 07:27 AM2017-05-02T07:27:53+5:302017-05-02T07:27:53+5:30

महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण ४०० कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे.

Did the government sleep till the Rs 400 crore Touhadal scam? - Uddhav Thackeray | ४०० कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ? - उद्धव ठाकरे

४०० कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ? - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 2 - महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण ४०० कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार नसून पारदर्शक असे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तूरडाळ घोटाळ्याचे खापर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर फोडता येणार नाही. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ?  असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
 
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी  आपल्याच सरकारला सुनावले आहे. ४०० कोटी हा सरकारी आकडा आहे. हा आकडा ७००-८०० कोटींपर्यंत सहज असू शकतो. तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली आहे. तूरडाळीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळे भाव कोसळले. हे नेहमीचेच उत्तर आहे. मुळात सरकार बदलले तरी शेतकऱ्यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे अशी टीका उद्धव यांनी केली आहे. 
 
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज नसल्यामुळे हे सर्व घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता दिली आहे ठीक आहे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही आणि मुख्यमंत्र्यांना सरकारी केंद्रावरील व्यापाऱ्यांच्या तूरडाळ घोटाळ्याचा अंदाज आला नाही. सरकार मस्त मजेत आणि खुशीत आहे व शेतकरी मात्र पानिपत झाल्यासारखा कोसळला आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- तूरडाळीच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही हे मान्य करू. मग काल नाशिक, लासलगाव, सटाण्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस आल्याने सर्वच शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. निदान या अवकाळी गारपिटीचा तरी अंदाज आमच्या सरकारी यंत्रणेस यायलाच हवा होता. या गारपिटीचा अंदाज आधीच आला असता तर शेतकऱ्यास आपली पिके वाचवता आली असती. अर्थात नवी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीची घोषणा आता मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तरीही २० लाख टन तूरडाळीचे व ४०० कोटींच्या घोटाळ्याचे काय करायचे हा प्रश्नच आहे!
 
- महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण ४००कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार नसून पारदर्शक असे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तूरडाळ घोटाळ्याचे खापर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर फोडता येणार नाही. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय? ४०० कोटी हा सरकारी आकडा आहे. हा आकडा ७००-८०० कोटींपर्यंत सहज असू शकतो. तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली आहे. तूरडाळीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळे भाव कोसळले. हे नेहमीचेच उत्तर आहे. मुळात सरकार बदलले तरी शेतकऱ्यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे. 
 
- राज्यात शेतकऱयांनी पिकवलेली तूरडाळ ‘दलाल’ आणि ‘मोठय़ा’ व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने खरेदी केली आणि तीच डाळ हे व्यापारी आता सरकारी केंद्रांवर आणून चढ्या किमतीत विकत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने सरकारची फसवणूक करून स्वतःची ‘तुमडी’ भरणाऱ्यांना सोडणार नाही, असा दम मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्याना भरला आहे. जलयुक्त शिवारामुळे यावेळी तुरीचे उत्पादन वाढले. ते इतके की २० लाख टनांपर्यंत गेले. त्यामुळे गणित कोलमडले. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज नसल्यामुळे हे सर्व घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता दिली आहे ठीक आहे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही आणि मुख्यमंत्र्यांना सरकारी केंद्रावरील व्यापाऱ्यांच्या तूरडाळ घोटाळ्याचा अंदाज आला नाही. 
 
- सरकार मस्त मजेत आणि खुशीत आहे व शेतकरी मात्र पानिपत झाल्यासारखा कोसळला आहे. हवामानाचा अंदाज आला नाही याचे खापर शेतकऱयांवर फोडून सरकारला नामानिराळे राहता येईल काय? सरकारचे हवामान खाते, मौसम विभाग, कृषी खाते वगैरे आहे. त्यांच्यापाशी संपूर्ण अद्ययावत यंत्रणा असल्याने हवामानाचा अंदाज सरकारला यायलाच हवा होता व सरकारने शेतकऱ्यांना सावध करायला हवे होते. शेतकऱ्यांचा अंदाज चुकला ही सरकारची चूक आहे. राजकारणातले सर्व अंदाज बरोबर येतात. तेथे का चुका होत नाहीत?
 
- सरकार अस्थिर झाले तर कोणते मासे गळाला लावायचे व त्यांना काय द्यायचे याचा अंदाज सरकारी यंत्रणेचा वापर करून येत असेल तर तोच अंदाज तूरडाळीच्या उत्पादन आणि नंतरच्या घोटाळय़ांबाबत का येऊ नये? अस्थिर सरकार टिकविण्यासाठी व राजकीय फासे सोयीचे पडावेत यासाठी जे शर्थीचे प्रयत्न केले जातात तितके प्रयत्न शेतकरी वाचविण्यासाठी होत नाहीत. तूरडाळीच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही हे मान्य करू. मग काल नाशिक, लासलगाव, सटाण्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस आल्याने सर्वच शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. द्राक्ष, डाळिंब, कांदा, गहू अशा पिकांचे नुकसान झाल्याने येथेही शेतकरी अर्धमेलाच झाला आहे. मराठवाडय़ातील शेतकऱ्याचेही मोठे नुकसान झाले. ज्वारीच्या खळय़ांचे, आंबा-द्राक्ष बागांचे नुकसान झाले. निदान या अवकाळी गारपिटीचा तरी अंदाज आमच्या सरकारी यंत्रणेस यायलाच हवा होता. या गारपिटीचा अंदाज आधीच आला असता तर शेतकऱ्यास आपली पिके वाचवता आली असती. अर्थात नवी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीची घोषणा आता मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तरीही २० लाख टन तूरडाळीचे व ४०० कोटींच्या घोटाळय़ाचे काय करायचे हा प्रश्नच आहे!

Web Title: Did the government sleep till the Rs 400 crore Touhadal scam? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.