कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:14 AM2018-03-01T04:14:14+5:302018-03-01T04:14:14+5:30

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही.

 Did the Government support Coorga Bhima Violence? Mundane's question, rowdy opposition | कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

googlenewsNext

मुंबई : मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही. त्यांच्यापुढे सरकार हतबल झाले असून कोरेगाव-भीमाच्या घटनेला सरकारचे पाठबळ होते का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. याप्रकरणी सभागृहात नियम २८९ अन्वये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. दोषींना अटक करावी या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सुरुवातीला वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
१ जानेवारीपूर्वीच काही संघटनांनी कोरेगाव भीमा परिसरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. याची कल्पना असूनही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या घटनेला दोन महिने उलटूनही हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झाली नसल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप , जोगेंद्र कवाडे यांनीही हिंसाचारामागील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
त्यामुळे यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेली स्थगन प्रस्तावाची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावली. याशिवाय विरोधकांच्या अन्य तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनातच नाकारल्याची घोषणा सभापतींनी केली. मात्र, स्थगन प्रस्तावावर बोलू देण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सभापतींनी दिवसरभराचेच कामकाज तहकूब केले.

Web Title:  Did the Government support Coorga Bhima Violence? Mundane's question, rowdy opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.