वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? बडोलेंच्या कन्येने शिष्यवृत्ती नाकारली , मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:32 AM2017-09-08T04:32:45+5:302017-09-08T04:33:01+5:30

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती हिला ब्रिटनमधील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे वादळ निर्माण झाल्यानंतर आता ही शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे एक भावनिक पत्र

Did the minister's ministry reduce my quality? Badolen's daughter denied scholarship, letter sent to Chief Minister | वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? बडोलेंच्या कन्येने शिष्यवृत्ती नाकारली , मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? बडोलेंच्या कन्येने शिष्यवृत्ती नाकारली , मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती हिला ब्रिटनमधील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे वादळ निर्माण झाल्यानंतर आता ही शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे एक भावनिक पत्र तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज लिहिले.
‘कुणाचाही हक्क मी कधीही डावलला नाही व डावलणारही नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि त्यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असल्याने मी व्यथित झाली आहे. त्यामुळे मी मला मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा लाभ नम्रतापूर्वक नाकारत आहे,’ असे श्रुतीने या पत्रात म्हटले आहे.
माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या परदेशातील शिक्षणासाठी कर्ज घेतले व त्याची परतफेड ते अजूनही करीत आहेत. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीचा शासनाचा नियम आहे. त्यात मी पात्र असेल तर हा माझा दोष आहे का? माझे शिक्षण गुणवत्तेच्या आधारे झाले आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का, असा सवाल श्रुतीने पत्रात केला आहे. जगातील पहिल्या ३० विद्यापीठांत असलेल्या मँचेस्टर विद्यापीठात मला पीएच.डी.साठी (खगोलशास्र व अंतराळ संशोधन) प्रवेश मिळाला आहे. मी हा अभ्यासक्रम पूर्ण करीनच. राज्याचे पालक म्हणून मी तुमची मुलगी आहे. आपल्या राज्यासाठी, देशासाठी, सावित्रीबाई व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी शिकणारच, असेही तिने पत्रात म्हटले आहे.
समाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचा मुलगा अंतरिक्ष यालाही विभागाची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्याने मात्र ही शिष्यवृत्ती नाकारलेली नाही. ‘अंतरिक्षला नियमानुसार शिष्यवृत्ती मिळाली असल्याने ती नाकारण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका वाघमारे यांनी घेतल्याचे समजते.
‘त्या’ आदेशाचा फायदा बडोले यांच्या कन्येला-
बडोले हेच सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांच्या विभागाने १६ जून २०१५ रोजी असा आदेश काढला की पहिल्या शंभर रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास पालकांच्या उत्पन्नाची अट नसेल. या आदेशाचा फायदा बडोले यांच्या कन्येला झाला आणि तिला नियमानुसारच शिष्यवृत्ती मिळाल्याचे सांगण्यास बडोले मोकळे झाले, असा आक्षेप आहे. १०१ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्यांच्या पालकांचे उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट त्या आदेशात टाकण्यात आली. तत्पूर्वी सर्वच रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश घेणाºयांच्या पालकांसाठी उत्पन्नाची अट होती.

Web Title: Did the minister's ministry reduce my quality? Badolen's daughter denied scholarship, letter sent to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.