३ वर्ष दाढी केली नाही, पत्नी ग्राम पंचायत जिंकली अन् नवस पूर्ण; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं 'पुष्पा स्टाइल' सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 12:08 IST2022-12-20T12:07:28+5:302022-12-20T12:08:03+5:30
राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.

३ वर्ष दाढी केली नाही, पत्नी ग्राम पंचायत जिंकली अन् नवस पूर्ण; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं 'पुष्पा स्टाइल' सेलिब्रेशन!
राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. गाव जिंकलं की विधानसभेचा मार्ग सुकर होतो असं म्हणतात. त्यामुळे ग्रामपंयाचत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली असते. गावपातळीवर सरपंच आणि आपलं पॅनल जिंकण्यासाठी कार्यकर्ते जिवाचं रान करत असतात. माती तुडवत घरोघरी जाऊन प्रचार करत असतात. तर काही कार्यकर्ते नवसही करतात. याचंच एक उदाहरण पंढरपुरात पाहायला मिळालं आहे.
सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम
पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय प्राप्त केला आहे. यात अमरजित पवार यांनी राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय केस-दाढी न करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून अमरजित यांनी दाढी केली नव्हती. आज आजोती ग्रामपंचायतीत पवार यांच्या पत्नीचा विजय होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला आहे. तर अमरजित पवार यांनी अगदी 'पुष्पा स्टाईल' सेलिब्रेशन करत नवस पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!
"निवडणुकीत लोकांना पिण्याचं पाणी, अंतर्गत गटारे आण रस्ते देईन असं वचन गावकऱ्यांना दिलं होतं. त्याचसोबत गावकऱ्यांनी निवडून दिलं तर माझे केस आणि दाढी तिरुपतीच्या चरणी अर्पण करेन असा पण केला होता. आज ग्रामस्थांनी आणि मित्रांनी माझ्या पाठिशी उभं राहून माझा पण पूर्ण केला", असं अमरजित पवार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम