एसटीवर वाढला डिझेलचा भार
By admin | Published: May 13, 2014 10:27 PM2014-05-13T22:27:12+5:302014-05-14T02:23:42+5:30
एसटी महामंडळावरील आर्थिक भार वाढतच जात आहे. नुकत्याच झालेल्या डिझेल दरवाढीनंतर एसटीच्या खर्चात आणखी ४ कोटींनी वाढ होणार असल्याने डिझेलवर दरमहा होणारा खर्च आता २०४ कोटींवर गेला आहे.
Next
दरवाढीचा फटका : महिन्याचा खर्च गेला २०४ कोटींवर
मुंबई : एसटी महामंडळावरील आर्थिक भार वाढतच जात आहे. नुकत्याच झालेल्या डिझेल दरवाढीनंतर एसटीच्या खर्चात आणखी ४ कोटींनी वाढ होणार असल्याने डिझेलवर दरमहा होणारा खर्च आता २०४ कोटींवर गेला आहे.
डिझेलच्या दरात १ रुपये ९ पैसे वाढ करण्यात आली. सध्या एसटी महामंडळाला गर्दीच्या काळात दररोज साधारणत: १३ ते १३ लाख ५० हजार लिटर डिझेल लागते, तर इतर दिवशी हेच डिझेल दिवसाला ११ लाख लिटर एवढे लागते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये खर्च एसटी महामंडळाला सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)