डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; गेल्या २० दिवसांत एका लिटरमागे ४.३८ रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:09 PM2020-06-27T22:09:43+5:302020-06-27T22:15:26+5:30

महांडळाला नियमित एसटीच्या वाहतूकीसाठी दैनंदिन १२ लाख लिटर डिझेल लागले. यामध्ये सुमारे १८ हजार एसटी फेऱ्या रस्त्यांवर धावतात.

Diesel price hike hits ST; An increase of Rs 4.38 per liter in the last 20 days | डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; गेल्या २० दिवसांत एका लिटरमागे ४.३८ रुपयांची वाढ

डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; गेल्या २० दिवसांत एका लिटरमागे ४.३८ रुपयांची वाढ

Next
ठळक मुद्दे१ जून रोजी एक लिटर डिझेल ६४. ४७ रुपयांना होते. मात्र आता यासाठी ६८.८५ रुपये एसटीला मोजावे लागत आहेत. त्यामुळे एका लिटरमागे एसटीला ४.३८ रुपयांची झळ सोसावी लागत आहे.

मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम एसटीवर होत आहे. डिझेलच्या दर वाढीमुळे तोट्यातील एसटीचे चाक आणखी खोलात जात आहे. १ जून रोजी एक लिटर डिझेल ६४. ४७ रुपयांना होते. मात्र आता यासाठी ६८.८५ रुपये एसटीला मोजावे लागत आहेत. त्यामुळे एका लिटरमागे एसटीला ४.३८ रुपयांची झळ सोसावी लागत आहे.

महांडळाला नियमित एसटीच्या वाहतूकीसाठी दैनंदिन १२ लाख लिटर डिझेल लागले. यामध्ये सुमारे १८ हजार एसटी फेऱ्या रस्त्यांवर धावतात. त्यातून महामंडळाला दैनंदिन २२ कोटींचे उत्पन्न सुद्धा मिळते. मात्र, सध्या एसटीची प्रवासी सुविधा संपूर्ण बंद आहे. फक्त मुंबई उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून, राज्यामध्ये आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यामध्येही डिझेल खर्च जास्त होत असून, अनेकवेळा एका प्रवाशाला घेऊनच एसटी प्रवास करताना दिसून येत आहे.

महामंडळाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वर्षाला ३ हजार कोटीची फक्त डिझेल खरेदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात दरवर्षी सुमारे २ हजार ८०० कोटींचा डिझेलवर खर्च होत असल्याने, उत्पन्नाच्या तुलनेत जास्तीत जास्त खर्च डिझलेवर होताना दिसून येत आहे. त्यामध्ये आता लॉकडाऊऩमुळे एसटीची सेवा बंद असतांनाही डिझेल दरवाढ झाली असतांनाही एसटीला महागाचे डिझेल विकत घेऊन अत्यावश्यक सुविधा द्यावीच लागत आहे. त्यामुळे भविष्यात मात्र, एसटीची वाट मात्र, खराब असल्याची दिसून येत आहे.

मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून अत्यावश्यक सेवेतील कमर्चाऱ्यांसाठी एसटी धावत आहेत. यासाठी २ हजार २०० हून अधिक फेऱ्या धावत आहेत. मात्र  एका फेरीला अंदाजे १२.५० लीटर डिझेल लागते. तर, संपूर्ण फेऱ्यांसाठी २७ हजार ५०० लीटर डिझेल लागत आहे. यासाठी एसटीला सुमारे १९ लाख रुपये खर्च होत आहे. मात्र एसटीला या फेऱ्यामधून उत्पन्न सुमारे १९ लाख रुपयांचे होत असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. त्यामुळे एसटीला कोणत्याही प्रकारचा नफा मिळताना दिसून येत नाही. 

मे महिन्याच्या तुलनेत १३.३ रुपये अधिक मोजावे लागत आहेत 
लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या एसटीला आता डिझेल दरवाढीचा चांगलाच फटका बसताना दिसून येत आहे. लॉक़डाऊन काळात दरदिवशी पेट्रोल, डिझेल दरवाढ होत आहे. एसटी महामंडळाने २१ मे रोजी ५५. १७ रूपयांमध्ये मध्ये विकत मिळत होते. तर, १ जुन रोजी ६४. ४७ रूपयाने विकत घ्यावे लागले आहे. तर, आता  यासाठी ६८.८५ रुपये एसटीला मोजावे लागत आहेत. त्यामुळे  १३.३ रूपयांची वाढ एसटीला सोसावी लागत आहे. 

- राज्यभरात एसटीची सेवा काही प्रमाणात सुरु आहे. जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थी एसटीचा मुख्य प्रवासीवर्ग आहे. मात्र लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी नाहीत. तर, ज्येष्ठ नागरिक प्रवास करण्यास बाहेर पडत नाही. त्यामुळे एसटीची सेवा कमी-अधिक प्रमाण सुरु आहे. त्यामुळे डिझेल खर्च आणि प्रवासी उत्पन्न यांचा मेळ सध्या बसत नसल्याचे दिसून येत आहे.

- डिझेलवर एसटीचा वर्षाला ३ हजार कोटी खर्च होतो. केंद्र सरकारचा अबकारीकर व राज्य सरकारचा डिझेलवर मूल्यवर्धितकर कर हटवले पाहिजे.  तर, वर्षाला १ हजार २०० कोटींची बचत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेचे सरचिटणीस  श्रीरंग बरगे यांनी दिली.  

आणखी बातम्या...

"फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना महामंडळाकडे दुर्लक्ष केलं अन् आता फक्त राजकीय स्टंटबाजी करतायेत"

ठाण्यात सोमवारपासून लॉकडाऊन? लवकरच जाहीर करणार हॉटस्पॉटची ठिकाणे

शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार

"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर 

Web Title: Diesel price hike hits ST; An increase of Rs 4.38 per liter in the last 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.