Diesel Prices Hike: महाराष्ट्रात डिझेलचा दर 100 रुपयांच्याही वर; पेट्रोलनंतर डिझेलनंही ठोकलं शतक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:26 PM2022-03-29T22:26:17+5:302022-03-29T22:28:11+5:30
महाराष्ट्रात डिझेलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
पेट्रेलनंतर आता डिझेलनेही शतक ठोकले आहे. महाराष्ट्रात डिझेलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्थानिक इंधन पंप असोसिएशनच्या एका पदाअधिकाऱ्यानुसार, मंगळवारी महाराष्ट्रातील परभणीमध्ये डिझेलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज परभणीमध्ये डिझेल जवळपास 100.70 रुपये प्रतिलिटर, तर पेट्रोल 118.07 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 70 पैसे आणि 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
म्हणून परभणीमध्ये महाग विकलं जातंय डिझेल?
परभणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसूरकर यांनी पीटीआयला-भाषासोबत बोलताना सांगितले की, "परभणीमध्ये इंधनाचा दर अधिक आहे कारण ते मनमाड डेपोतून आले जाते. येथून मनमाड डेपोचे अंतर 340 किलोमीटरहूनही अधिक आहे. आम्ही औरंगाबादमध्ये एक डेपो तयार करण्याची मागणी केली आहे. यामुळे इंधनाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी होतील. तसेच इंधन जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना अधिक दिलासा मिळेल," असेही ते म्हणाले.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे नवे दर -
मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 115.04 रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलने शतक गाठले असून, आता लीटरमागे 100.21 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल 109.68 रुपये असून, चेन्नईत पेट्रोलचा भाव 105.94 रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी 9 ते 12 रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.
प्रमुख शहरांमधील डिझेलचे नवे दर -
मुंबईत एक लीटर डिझेलचा दर 99.25 रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल 91.47 रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर 96 रुपये इतका असून, कोलकात्यात डिझेलचा भाव 94.62 रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी 9 ते 12 रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.