डिझेल चोरी प्रकरण; तीन पोलीस निलंबित

By admin | Published: June 9, 2017 12:48 AM2017-06-09T00:48:28+5:302017-06-09T00:48:28+5:30

डिझेल चोरी करणाऱ्या रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भिडे, सुहास ठोंबरे व पोलीस कर्मचारी शिवशरण यांना निलंबित केले

Diesel theft case; Three police suspended | डिझेल चोरी प्रकरण; तीन पोलीस निलंबित

डिझेल चोरी प्रकरण; तीन पोलीस निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव येथील एचपीसीएल कंपनीच्या पाइपलाइनला व्हॉल्व्ह बसवून डिझेल चोरी करणाऱ्या रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भिडे, सुहास ठोंबरे व पोलीस कर्मचारी शिवशरण यांना निलंबित केले आहे.
लोहगाव येथील एचपीसीएल कंपनीच्या डिझेल, पेट्रोलच्या पाइपलाइनला छिद्र पाडून पाच हजार लिटर डिझेल चोरण्यात आले होते. गुन्हे शाखेने भिडे , ठोंबरे, शिवशरण या तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह इस्माईल पिरमहंमद शेख , मोतीराम शंकर पवार आणि दिनेश अनिल पवार यांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने शुक्रवार, ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पेट्रोलचोरीचे हे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणात कंपनीतील कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Diesel theft case; Three police suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.