विद्यार्थी, शिक्षकांच्या नात्यात दुरावा
By admin | Published: July 12, 2014 11:10 PM2014-07-12T23:10:09+5:302014-07-12T23:10:09+5:30
शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष लोकमतने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला.
वाशिम : गुरुकुलाची परंपरा लाभलेल्या आपल्या समाजात शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष लोकमतने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी घडविण्याच्या व्यापक विचारांना तिलांजली देत केवळ विषयापुरती चाकोरी आखुण घेतली आहे. तर विद्यार्थ्यांनाही केवळ परिक्षेत गुण मिळविण्यासाठी शिक्षकांची निकड भासत आहे. यातूनच या नात्यामधील दुरावा दिवसागणिक वाढत चालला आहे.
१२ जुलैला सर्वत्र गुरूपोर्णिमेचा उत्सव साजरा झाला. त्याच पृष्ठभूमिवर विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नात्यातील ओलाव्याची स्थिती जाणू घेण्यासाठी लोकमतने एक सर्व्हेक्षण केले. यामध्ये लोकमतच्या चमूने महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांशी संवाद साधला. या सर्व्हेक्षणात गुरू -शिष्यातील नात्यांची पकड काहीअंधी सैल झाल्याचे दिसून आले. वाढत्या विद्यार्थिसंख्येमुळं अनेक शाळांमध्ये दोन शिफ्टमध्ये अध्यापन चालतं. शिक्षक आपापल्या शिफ्टचा आणि विषयाचा विचार करतात; सर्वांगीण विद्यार्थिहिताचा विचार हळूहळू मागे पडत आहे, असा अनुभव आला. संस्कारक्षम वयात गुरुविषयी असलेला आदर पुढे क्रमश: घटत जातो ,असेही यातून पाहायला मिळाले. प्राथमिक शाळेत शिक्षक-विद्यार्थ्यांत नातं निर्माण होतं. गुरूची ओळख विद्याथ्यार्ला तेव्हा प्रथमच होत असल्यामुळं या कोवळ्या वयात या नात्यात ओलावा असतो. या वयात शिक्षकाशी जडलेलं नातं विद्यार्थी कायम जपतात. दहावी-बारावी पास झाल्यावर अनेक विद्यार्थी पहिल्या शिक्षकाला पेढे देतात. कुठेही भेटले, तरी आदरानं नमस्कार करतात. पूवीर्ची पाया पडण्याची पद्धत मागं पडली असली, तरी तोच आदर या शिक्षकाविषयी दिसतो.
माध्यमिक शिक्षण घेताना ज्या विषयात रस असेल, त्या शिक्षकाशी हे नातं टिकून राहिल्याचा अनुभव येतो. बाकी विषय, विशेषत: अवघड विषय शिकविणार्या शिक्षकाशी व्यक्तिगत नातं निर्माण होत नसल्याचे सर्व्हेतून दिसून आले.