महिला चालकांच्या रिक्षाला वेगळा रंग

By admin | Published: January 13, 2016 02:01 AM2016-01-13T02:01:59+5:302016-01-13T02:01:59+5:30

मुंबई महानगर क्षेत्रातील नूतनीकरण न झालेल्या तसेच रद्द झालेल्या ३५ हजार ६२८ रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. अंधेरी आरटीओतील सभागृहात आयोजित

Different colors of women's autorickshaw | महिला चालकांच्या रिक्षाला वेगळा रंग

महिला चालकांच्या रिक्षाला वेगळा रंग

Next

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील नूतनीकरण न झालेल्या तसेच रद्द झालेल्या ३५ हजार ६२८ रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. अंधेरी आरटीओतील सभागृहात आयोजित लॉटरी सोडतीचे उद्घाटन या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महिला रिक्षा चालकांसाठी असणाऱ्या रिक्षांचा रंग काळा-पिवळ्यापेक्षा वेगळा ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असल्याची माहिती रावते यांनी दिली. ही माहिती
देतानाच एक लाख रिक्षा परवाने
येत्या काही महिन्यांत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांची आॅनलाइन लॉटरी पद्धतीने मंगळवारी सोडत काढण्यात आली. त्या वेळी उद्घाटनप्रसंगी रावते यांनी महिलांसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातील सर्व परवाने महिलांसाठी ठेवले जातील, अशी शाश्वती दिली. मुंबईत महानगर क्षेत्रात ३५ हजार ६२८ परवान्यांचे आॅनलाइन पद्धतीने लॉटरी सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी १ लाख २९ हजार ५५५ अर्ज आले होते. यात ३३ हजार ८४७ पुरुष तर ४६५ महिला विजेत्या ठरल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. परिवहन विभागाने महिलांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवले आहे. या कोट्यातील जवळपास १,४00 परवाने शिल्लक राहिले असून, हे परवाने केवळ महिलांसाठीच आरक्षित राहतील, असे स्पष्ट केले. जाहीर झालेल्या लॉटरीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रात रिना सॅम्युअल, वंदना घाडी, तृप्ती पोफळे आणि नूतन खळे यांचा पहिल्या ४ क्रमांकांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)

रिक्षा-टॅक्सी चालकांना खडेबोल
प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे काम हे रिक्षा-टॅक्सी चालकांचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यांच्याकडून चांगली सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याचे मत रावते यांनी व्यक्त केले.
मुंबई महानगर क्षेत्राव्यतिरिक्त पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांतील महानगरपालिका क्षेत्रातील रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचीही लॉटरी सोडत काढण्यात आली.

Web Title: Different colors of women's autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.