हटके प्रयोग फलदायी ठरू शकतील

By admin | Published: January 1, 2015 02:08 AM2015-01-01T02:08:11+5:302015-01-01T02:08:11+5:30

संगीत क्षेत्राचा सर्वसमावेशक विचार केला, तर या मराठीच्या प्रांतातील गाण्यांना वाईट दिवस असल्याचे दिसून येते. चित्रपट संगीत ऐकू येत आहे.

Different experiments can be fruitful | हटके प्रयोग फलदायी ठरू शकतील

हटके प्रयोग फलदायी ठरू शकतील

Next

संगीत क्षेत्राचा सर्वसमावेशक विचार केला, तर या मराठीच्या प्रांतातील गाण्यांना वाईट दिवस असल्याचे दिसून येते. चित्रपट संगीत ऐकू येत आहे. अल्बमद्वारेही गाणी ऐकण्यास मिळत आहेत. मध्यंतरी तर रोमॅँटिक गाण्यांकडे कल असल्याचे दिसून आले. अजित सिंग यांच्यामुळे ही गाणी ऐकायला येऊ लागली. भविष्यकाळही अशा गाण्यांसाठी प्रॉमिसिंग वाटतो. उडती गाणी चित्रपटांमधून ऐकायला मिळतात.

आजोबा श्यामराव कुलकर्णी गायक. गझल हा त्यांच्या आवडीचा विषय. पुण्यात त्या काळातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. सुधीर फडके आणि भीमसेन जोशी अशा दिग्गज व्यक्तींशी त्यांची मैत्री. त्यांच्यामुळे या दिग्गज व्यक्तींना जवळून ऐकण्याची संधी मिळाली. माझे शास्त्रीय संगीतातील प्राथमिक शिक्षण आजोबा आणि गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे झाले. सध्या राजेंद्र कंदलगावकर यांच्याकडे शिक्षण सुरू आहे. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू होता. पण शास्त्रीय संगीतासाठी आवाज योग्य नाही, अशा प्रतिक्रिया आल्याने फ्युजनाचा मार्ग स्वीकारला.
संगीत क्षेत्राचा सर्वसमावेशक विचार केला, तर या मराठीच्या प्रांतातील गाण्यांना वाईट दिवस असल्याचे दिसून येते. चित्रपट संगीत ऐकू येत आहे. अल्बमद्वारेही गाणी ऐकण्यास मिळत आहेत. कॅसेटचा जमाना गेला. नेटद्वारे गाणी डाऊनलोड करून घेता येत असल्याने सीडी विक्रीचे प्रमाणही कमी झाले आहे. पायरसीचा मुद्दा हा आहेच.
मध्यंतरीचा विचार केला तर रोमॅँटिक गाण्यांकडे कल असल्याचे दिसून आले. अजित सिंग यांच्यामुळे ही गाणी ऐकायला येऊ लागली. त्यामुळे भविष्यकाळही अशा गाण्यांसाठी प्रॉमिसिंग वाटतो. उडती गाणी चित्रपटांमधून ऐकायला मिळतात. ही गाणी वाईट नाहीत, अशा गाण्यांमध्येही भविष्यात प्रयोग दिसून येतील.
काही मराठी चित्रपटांतून वाईट ट्रेंड पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटातील गाणी प्रसिद्ध होण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील गायक घ्यायचा आणि त्याकडून मराठी गाणे गाऊन घ्यायची. गाण्याचे, चित्रपटाचे नाव व्हावे, हा त्यामागे उद्देश असतो. पण हा ट्रेंड मारक ठरू शकतो. दिग्दर्शक, प्रोड्युसरची खास करून ही मागणी असते. दक्षिण, बंगाली चित्रपटसृष्टीला त्या त्या भाषेने कलाकार दिले आहेत. मराठी चित्रपटांना, मराठी संगीताला वेगळा दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल, तर हिंदीतून आयातबंदी करावी लागेल.
विविध वाहिन्यांद्वारे गाण्यांच्या स्पर्धा होतात. कार्यक्रम होतात. त्यातून संगीतसृष्टीला कलावंत, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने मिळतील, असे नाही. कारण लाइव्ह कार्यक्रम आणि स्टुडिओतील रेकॉर्डिंग यात खूप फरक आहे. या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला साध्य होतील, असे नाही. बऱ्याच कलाकारांना स्टेजवरून गाणे सादर करणे सोपे वाटते. पण स्टुडिओसाठी एक्सपीरिअन्स हा लागतोच.
भविष्यात फ्युजनला स्कोप आहे. मराठीत या दृष्टीने काय करता येईल, याचा या क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ विचार करीत आहेत. माझाही या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ट्रॅकवर गाणी सादर करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. संगीत संयोजन करून ते रेकॉर्ड केले जाते. त्या रेकॉर्डच्या अनुषंगाने गायक गाणे सादर करतो, पण त्यास मर्यादा येतात. थेट गाणे सादर करणे हा गायक कलाकाराचा स्थायीभाव असतो. तो या प्रकारात दिसून येत नाही.
गायन, रेकॉर्डिंग याचा बिझनेस पुण्यात वाढत आहे. ही संगीत क्षेत्राच्या दृष्टीने फलदायी घटना आहे. रेकॉर्डिंग, डबिंगसाठी काही स्टुडिओ निघाले आहेत, पण ते पुरसे नाहीत. त्यामुळे अनेकांना अजूनही मुंबईचाच रस्ता धरावा लागतो. येत्या काही वर्षांत यासुद्धा सुविधा पुण्यात हमखास मिळू शकतील.

प्रत्येक क्षेत्रात प्रयोग हा स्थायीभाव आहे. नवनवीन प्रयोग करणे हे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. त्याला संगीत क्षेत्रही अपवाद नाही. मराठी चित्रपटातील गाणी हिट व्हावीत, यासाठी गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध गायकांकडून गाणी गाऊन घेतली जात आहेत. पण हा ट्रेंड मराठी संगीत क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या कलाकारांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. मराठी कलाकारांना चांगले दिवस दाखवायचे असतील, तर हा ट्रेंड थांबला पाहिजे. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी हटके प्रयोग केल्यास येणारे वर्ष मराठी गायक, संगीत संयोजक यांच्यासाठी लाभदायी ठरू शकते, असे युवा गायक आणि संगीत संयोजक जसराज जोशी सांगत होता !

 

Web Title: Different experiments can be fruitful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.