दिगंबर कामतांना अटकपूर्व जामीन
By admin | Published: August 20, 2015 12:28 AM2015-08-20T00:28:54+5:302015-08-20T00:28:54+5:30
जैका प्रकल्पातील कामाचे कंत्राट देण्यासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून कथित लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत
लुईस बर्जर-जैका लाच प्रकरण
पणजी : जैका प्रकल्पातील कामाचे कंत्राट देण्यासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून कथित लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना बुधवारी दिलासा मिळाला. अटक करण्यास मज्जाव करणारा निवाडा देताना
पणजी विशेष न्यायालयाने बुधवारी कामत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
क्राइम ब्रँचमध्ये बोलावल्यानंतर कामत यांनी क्राइम ब्रँचच्या कार्यालयात येऊन चौकशीस हजेरी लावली, तसेच कामत यांची कोठडी नेमक्या कोणत्या कारणासाठी हवी, हे तपास अधिकाऱ्याने स्पष्ट केले नाही, ही दोन कारणे दाखवून न्यायाधीशांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. अर्ज मंजूर करतानाच एक लाख रुपये हमी, एक हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा सोडून न जाणे, आवश्यक तेव्हा तपासासाठी तपास यंत्रणांसमोर उपस्थित राहाणे, पासपोर्ट न्यायालयात सादर करणे, या अटींवर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन मंजूर केला.