कुंभमेळ््यातील दिगंबर खालशांचा वाद अखेर मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2015 02:24 AM2015-08-27T02:24:18+5:302015-08-27T02:24:18+5:30
दिगंबर आखाडयाने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरुन रंगलेल्या वादाला महंत व बहिष्कृत खालशांच्या महंतांनी अखेर पूर्ण विराम दिल्याने
नाशिक : दिगंबर आखाडयाने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरुन रंगलेल्या वादाला महंत व बहिष्कृत खालशांच्या महंतांनी अखेर पूर्ण विराम दिल्याने आखाडा व खालशांतील वादावर पडदा पडला आहे. दिगंबर आखाडयात झालेल्या बैठकीत महंत व बहिष्कृत खालशाचे महंत यांच्यात वाद मिटविणाऱ्या समितीचे ११ सदस्य व दिगंबर आखाडयाचे पुरीचे महंत गंगादास यांच्या मध्यस्थीने वाद मिटला.
महंत ग्यानदास नरमले !
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांनी महंत ग्यानदास महाराज यांनी अध्यक्षपदावरुन घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पाच महिन्यांपूर्वी उज्जैन येथे लोकशाही पद्धतीने दहा आखाड्यांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड झाली. अनुपस्थित असणाऱ्या दोन वैष्णव आखाड्यांनी फोनवरुन माझ्या निवडीला मान्यता दिली. आता पुढील निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदाची सूत्रे मी सांभाळणार आहे. कुंभमेळा शांततेत, निर्विघ्नपणे पार पडण्यावर माझा भर असेल, असे नरेंद्रगिरी महाराज यांनी दिले. (प्रतिनिधी)