डिजिटल ७/१२च्या उता-याच्या कामाला मिळणार गती, बीएसएनएलच्या क्लाऊडवर स्पेस उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:15 AM2017-10-11T04:15:44+5:302017-10-11T04:15:56+5:30
राज्य शासनातर्फे ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना डिजिटल सात-बारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने या कामात अडथळे येत आहेत.
पुणे : राज्य शासनातर्फे ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना डिजिटल सात-बारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या कामासाठी बीएसएनएल क्लाऊडवर स्पेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पुढील काळात डिजिटल सातबारा उताºयाच्या कामाला गती मिळणार आहे.
ई-फेरफार प्रकल्प समन्वक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत राज्यातील ४३ हजार ९४४गावांमधील १५ हजार ८७७ गावांचे डिजिटल उता-यांचे काम झाले आहे. महसूल दिनाच्या दिवशी सर्व शेतक-यांना आॅनलाईन उतारे उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. राज्यातील ३५ जिल्हांमधील ३५७ तालुक्यांमधील खाते प्रोसेसिंग पूर्ण झालेल्या गावांची संख्या २५ हजार ७३४ आहे. तर संगणकिकृत सात-बारा उता-यांची दुरुस्तू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रि-एडिट मॉड्यूल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १६ हजार ४५५ गावांमध्ये सर्व्हेक्षण करून दुरुस्ती करण्यात आली आहे.
राज्यात केवळ वाशिम जिल्ह्याचे डिजिटल उता-याचे काम पूर्ण झाले असून उस्मानाबाद व अकोला जिल्ह्याचे काम ९८ टक्के झाले आहे.