एसटी स्थानकांत डिजिटल डिस्प्ले

By admin | Published: September 15, 2014 04:22 AM2014-09-15T04:22:12+5:302014-09-15T04:22:12+5:30

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी सेवेत काही आधुनिक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून महामंडळाकडून एसटीचे संगणकीकरण येत्या काही वर्षांत केले जाणार

Digital display in ST locks | एसटी स्थानकांत डिजिटल डिस्प्ले

एसटी स्थानकांत डिजिटल डिस्प्ले

Next

मुंबई : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी सेवेत काही आधुनिक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून महामंडळाकडून एसटीचे संगणकीकरण येत्या काही वर्षांत केले जाणार आहे. या संगणकीकरणांतर्गत प्रामुख्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्थानक आणि आगारात एसटी बसच्या आगमन आणि निर्गमनाची वेळ दर्शविणारे ‘इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड’ बसवण्यात येणार असून, एसटी बसला स्थानक किंवा आगारात येण्यास लागणारा कालावधीही दर्शविला जाणार आहे.
एसटी महामंडळाचे प्रवासी घटत असून, अनेक खर्चांमुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. तरीही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे महामंडळ प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्यावर भर देत आहे. राज्यात मोठा पसारा असलेल्या एसटी महामंडळाने आता पूर्णत: संगणकीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे राज्यभर संगणकीकरणाची योजना महामंडळाने आखली असून, त्याअंतर्गत महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी सोयीसुविधा आणतानाच प्रवासी सेवांवरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने एसटी महामंडळ हे संगणकीकरण करणार आहे. यासाठी ४९३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात १८७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या या योजनेत आणखी काही समाविष्ट करता येते का याची चाचपणी सुरू असून, त्यानंतर महामंडळ अखेरचा अहवाल तयार करून राज्य सरकारमार्फत तो रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे. या संगणकीकरणासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय आणि एसटी महामंडळ हा निधी उभा करणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
राज्यातील एसटीचा कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न यात असेल. तसेच एसटीचे आॅनलाइन आरक्षणही यातून सुधारले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानक किंवा आगारात एसटी गाड्यांच्या आगमन आणि निर्गमनाची वेळ दर्शविणारे इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसवण्यात येणार आहेत. यात एसटीला इच्छित स्थळी जाण्यासाठी लागणारा वेळ, ठिकाण आदी बाबी दर्शविल्या जाणार आहेत. साधारण पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एसटीचे पूर्णत: संगणकीकरण केले
जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Digital display in ST locks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.