प्रचाराचा डिजिटल फंडा
By admin | Published: February 9, 2017 07:44 PM2017-02-09T19:44:39+5:302017-02-09T19:45:00+5:30
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे उमेदवारही यात मागे नाहीत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे उमेदवारही यात मागे नाहीत. प्रचाराच्या दृष्टीने मतदारांच्या घरोघरी जाण्यासोबतच सोशल मीडियाचाही जोरात वापर करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. उमेदवारांनी तर प्रभागनिहाय वॉट्सअॅप ग्रुपसुद्धा तयार केले आहेत. यात प्रत्येक पक्षाचेच उमेदवार आघाडीवर
आहेत.
निवडणुक म्हटली की, प्रचार आलाच. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पदयात्रा, जाहीर सभा, छोट्या सभा असे एक ना अनेक उपाय करावे लागतात. या निवडणुकीतही उमेदवार त्याचा वापर करीत आहेतच. परंतु यावेळी यात आणखी एक प्रचाराचे साधन जुळे आहे. ते म्हणजे सेशल मीडिया. या सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधणे अधिक सोपे
झाले आहे. उमेदवारांनी आपापल्या प्रभागानुसार वॉ्ट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत.
या ग्रुपवर प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांना जोडले जात आहे. सकाळी निघलेल्या पदयात्रांचे फोटो लगेत या ग्रुपवर सेंड करून ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष घरी जाऊन संवाद साधणे सुरूच आहे. परंतु जी मंडळी कामानिमित्त बाहेर असतात. त्यांच्यापर्यंत सुद्धा या सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचणे उमेदवारांना शक्य होत आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येकाच्याच मोबाईलवर अनेक प्रभागांचे नवनवीन ग्रुप आदळून पडत असल्याचे दिसत आहे. कोणत्या ग्रुपमध्ये ते कसे काय जोडल्या गेले हे त्यांनाही कळेनासे झाले आहे. उमेदवारांच्या या डिजिटल प्रचार फंडा सध्या शहरात चांगलाच यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.