डिजिटल सातबाऱ्याचे काम ९२ टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 06:19 PM2019-12-05T18:19:43+5:302019-12-05T18:24:13+5:30

सातबारा उताऱ्यांतील त्रुटी राहिल्यास ऑनलाईन अर्ज करा...

Digital sat bara completed 92% of the work | डिजिटल सातबाऱ्याचे काम ९२ टक्के पूर्ण

डिजिटल सातबाऱ्याचे काम ९२ टक्के पूर्ण

Next
ठळक मुद्देउर्वरित सात-बारा उताऱ्यातील त्रुटी दूर कराराज्यात २ कोटी ८२ लाख ९२  हजार सात-बारा उतारा२ कोटी १० लाख ४० हजार १४२ सात-बारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरीसातबारा उताऱ्यांतील त्रुटी राहिल्यास ऑनलाईन अर्ज करा 

पुणे : राज्यातील सातबारा उताऱ्यांपैकी ९२ टक्के उतारे डिजिटल झाले असून, ७१ लाखांहून अधिक सात-बारा उतारे डिजिटाईज होणे बाकी आहेत. या उताऱ्यांमधील त्रूटी दूर करु हे काम पूर्ण करण्याचे आदेश तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली. 
राज्यात २ कोटी ८२ लाख ९२  हजार सात-बारा उतारा असून, त्यापैकी २ कोटी १० लाख ४० हजार १४२ सात-बारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. हे सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. म्हणजेच सुमारे ९२ टक्के सातबारा डिजिटल झाले आहेत. उरलेल्या आठ टक्के उताऱ्यांमधे काही ना काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांना जमीन महसूल कायदा कलम १५५ अन्वये आदेश दिले आहेत. तसेच सातबारा उताऱ्यामधील त्रुटी योग्य प्रकारे दूर होत आहेत की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर सोपविली आहे. तसेच संबधित अधिकारी हे काम सुरळीतपणे करीत नसल्यास, अथवा त्यामध्ये चालढकल होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहे.  
सातबारा उताऱ्यातील त्रुटी येत्या दोन महिन्यात दूर करण्याबाबत नुकतेच राज्याचे अवर सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले आहेत. याबाबत मागील काही दिवसांपूर्वी श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्सरन्सद्वारे महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्रुटी राहिलेल्या सातबारा उताऱ्यांवर चर्चा केली होती. त्या नंतरच तहसिलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. 
--
सातबारा उताऱ्यांतील त्रुटी राहिल्यास ऑनलाईन अर्ज करा 
संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमधे त्रुटी असल्यास खातेदारांना ही त्रुटी दूर करण्यासाठी ई-हक्क प्रणाली द्वारे नलाईन अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती ई-महाभूमी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.  

Web Title: Digital sat bara completed 92% of the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.